कोल्हापूर- गडहिंग्लज-महागाव रस्त्यावर एसटी आणि सुमोचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये ४ जण जागीच ठार झाले आहेत. अपघातामधील सर्व मृत नूल गावचे रहिवाशी आहेत. याच रस्त्यावर आज सकाळी झालेल्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
कोल्हापुरात घातवार, एकाच रस्त्यावरील दोन अपघातात सहा ठार - st bus
कोल्हापुरात सुमो आणि एसटीच्या भीषण अपघात.... गडहिंग्लज महागाव रस्त्यावर झालेल्या या अपघातात ४ जण जागीच ठार... अपघातातील सर्व मृत कोल्हापूर जिल्ह्यातील नूल गावचे रहिवाशी....
चंदगडहून नूल गावाकडे परतत असताना नूल गावचे रहिवाशांची सुमो आणि एसटीचा दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास हा अपघात झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन स्थानिक रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठविले आहेत. नूल गावातील ४ जणांच्या झालेल्या मृत्यूने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
शनिवार हा गडहिंग्लज तालुक्यासाठी अपघाताचा वार ठरला आहे. सकाळी याच परिसरात झालेल्या अपघातात आई आणि मुलाचा जागीच मृत्यू झाला. वासंती नांदवडेकर आणि सोहम नांदवडेकर अशी त्यांची नावे आहेत. या घटनेनंतर काही तासातच दुसरा अपघात झाला यामध्ये ४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.