महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ऐन सणासुदीत एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार संघर्ष अटळ- कर्मचारी संघटनांचा इशारा

राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली आहे. ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने केला आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 18 संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार
एसटी कर्मचारी विरुद्ध राज्य सरकार

By

Published : Oct 27, 2021, 3:21 PM IST

कोल्हापूर- एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आजपासून (बुधवार) बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात झाली आहे. कोल्हापुरातील विभागीय कार्यालयासमोर या आंदोलनाला सुरुवात झाली. राज्य सरकारने तात्काळ मागण्या मान्य कराव्यात, अन्यथा येणाऱ्या काळात राज्य सरकार विरुद्ध कर्मचारी संघर्ष अटळ असल्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.


राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर महागाई भत्त्यात पाच टक्के वाढ केली आहे. ही केवळ एसटी कर्मचाऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचा आरोप एसटी कर्मचाऱ्यांच्या कृती समितीने केला आहे.

हेही वाचा-राज्यांत एसटी तिकिटांची दरवाढ; पाहा सर्वसामान्य प्रवाशांची प्रतिक्रया...

आमरण उपोषणात 18 संघटना सहभागी

एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी राज्यातील कर्मचाऱ्यांच्या 18 संघटनांनी एकत्र येऊन आजपासून बेमुदत आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. कोल्हापूर विभागातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात या आंदोलनाला सुरुवात झाली. महाराष्ट्र राज्य एसटी कामगार संघटना, इंटक, कास्ट्राईब संघटनासह अठरा संघटनांनी या आंदोलनात सहभागी होऊन आंदोलनाची व्याप्ती वाढवली आहे. कोल्हापूर विभागातील जवळपास 400 कर्मचाऱ्यांनी आज सहभाग घेतला आहे. राज्य सरकारच्या महागाई भत्ताच्या निर्णयाविरोधात आज घोषणाबाजी करण्यात आली. तसेच विविध मागण्यांसंदर्भात आज आवाज उठवण्यात आला.

हेही वाचा-ठाणे : ऐन सणासुदीच्या काळात एसटीची दरवाढ, प्रवाशांकडून नाराजी व्यक्त

तीव्र आंदोलन करण्याचा इशारा

राज्य सरकारने तात्काळ मागणी मान्य कराव्यात तरच कर्मचारी संघटना मागे हटतील, असा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. राज्य सरकारने एसटी महामंडळाचे राज्य सरकार मध्ये विलगीकरण करावे, अशी प्रमुख मागणी या आंदोलनात करण्यात आली आहे. जर राज्य सरकारने या गोष्टीचा विचार नाही केला, तर येणाऱ्या काळात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा सर्व एसटी कर्मचारी संघटनांनी दिला आहे.

हेही वाचा-एसटीप्रवास दरवाढ : उद्या (बुधवारी) एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यभर बेमुदत उपोषण

आंदोलनाच्या सुरुवातीला कोरोना काळात आर्थिक संकटाला सामोरे गेल्याने जवळपास सहा एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली आहे. या कर्मचाऱ्यांच्या फोटोंना श्रद्धांजली वाहून आमरण उपोषणाला सुरुवात केली.


सणासुदीत प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता-
राज्य सरकारने तात्काळ या मागण्या मार्गी लावाव्यात, अशी मागणी एसटी कर्मचारी संघटनांकडून होत आहे. जर राज्य सरकारने याकडे दुर्लक्ष केल्यास येणाऱ्या काळात सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होऊ शकतात. त्यामुळे त्याचा परिणाम एसटीच्या वाहतुकीवर होऊ शकतो. परिणामी ऐन सणासुदीच्या काळात प्रवाशांना याचे हाल सोसावे लागणार आहेत.

एसटी कर्मचारी कृती समितीच्या मागण्या

1)एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलनीकरण झाले पाहिजे.

2) राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे 28 टक्के महागाई भत्ता दिवाळीपूर्वी मिळालाच पाहिजे.
3) वाढीव घरभाडे 8, 16, 24 टक्के या दराने मिळालेच पाहिजे.
4) सर्व सण उचल 12,500 रुपये मिळालीच पाहिजे.
5) वार्षिक वेतन वाढ 2 टक्क्यांवरून 3 टक्के मिळालीच पाहिजे.
6) न्यायालयाने दिलेल्या आदेशाप्रमाणे ठरलेल्या तारखेस नियमित वेतन मिळालेच पाहिजे.
7) दिवाळी बोनस 15,00 रूपये मिळालाच पाहिजे.


दरम्यान, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित वेतन देण्यासाठी विशेष बाब म्हणून 112 कोटींचा निधी तातडीने वितरीत करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी दिले. उपमुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे महाराष्ट्रातील हजारो एसटी कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड होणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details