कोल्हापूर -गेल्या दोन ते अडीच महिन्यांपासून एसटीचे शासनात विलीनीकरण व्हावे, यासाठी एसटी कर्मचारी बेमुदत संपावर ( ST Employee Strike in Kolhapur ) गेले आहेत. अशातच काही एसटी कर्मचाऱ्यांचा मृत्यू देखील झालेला आहे. राज्यातील प्रत्येक एसटी डेपोमध्ये कर्मचारी संपावर बसलेले दिसत आहेत. मात्र, यावर सरकार तोडगा काढण्यासाठी पुढे येत नसल्याने एसटी कर्मचारी आणि सरकार या दोघांमध्ये सर्वसामान्य माणसाचे हाल होताना पाहायला मिळत आहेत.
कोल्हापुरात एसटी कर्मचारी काढणार भव्य मोर्चा संप चालू झाल्यापासून सरकार आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाबरोबर अनेक बैठका झाल्या. मात्र, यातून देखील तोडगा काय निघाला नाही. शिवाय हे प्रकरण उच्च न्यायालयात गेले आहे. मात्र गेल्या दोन ते अडीच महिन्यापासून संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांनी सरकारवर निशाणा साधत एसटी महामंडळ मोडीत काढून खासगीकरण करण्याचा घाट महाराष्ट्र सरकारने घातला आहे. आज या एसटी संपामुळे जे सर्वसामान्यांचे हाल होत आ. या सर्वाना सरकार जबाबदार असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे. तर आता कोल्हापुरातील एसटी कर्मचारी देखील आक्रमक झाले असल्याने एसटी कर्मचारी आणि कामगार संघटना संयुक्त कृती समिती एकत्र येत सोमवारी 14 फेब्रुवारी रोजी सी. बी. एस. स्टँड पासून जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा ( ST Employee protest in Kolhapur ) काढणार आहे, अशी माहिती कामगार संघटना संयुक्त कृती समितीचे कॉम्रेड अतुल दिघे आणि एस टी कामगार नेते उत्तम पाटील यांनी सांगितले. ते आज कोल्हापुरात पत्रकार परिषदेत बोलत होते.
संपाला १०० दिवस पूर्ण -
गेल्या 3 महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्याचे संप सुरू आहे. आता या संपला 100 दिवस झाले आहेत. 3 नोव्हेंबर 2021 पासून एस.टी. कामगार राज्यशासनात विलिनीकरण या एकमेव मागणीसाठी संपावर बसले आहेत. संपाला 100 दिवस होऊन देखील हा प्रश्न सोडवताना राज्य सरकार दिसत नाही. हायकोर्टाने सांगितल्या प्रमाणे समिती स्थापन झाल्यापासून समितीला 12 आठवड्याची मुदत दिली होती. ही मुदत 5 फेब्रुवारीला संपलेली आहे. मात्र, हा अहवाल सादर केला जात नाही. सरकार त्यामध्ये वेळकाढूपणा करत आहे. अशातच अहवाल अजून तयार नसल्याचे सांगत अजून एका आठवड्याची मुदत समितीने हायकोर्टामध्ये मागितली आहे. 100 दिवसापेक्षा जास्त दिवस चालू असलेल्या या संपात 86 कर्मचाऱ्यांच्या प्राणाची आहुती दिली गेलेली आहे. एक लाख कुटुंबाचा उदरनिर्वाह असलेल्या एसटीच्या संपाकडे सरकार अक्षम्य दुर्लक्ष करत आहे. म्हणून कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व श्रमिक संघटना, कृती समिती आणि एसटी कर्मचारी एकत्र येत या राज्य सरकारला जाब विचारण्यासाठी सोमवारी 14 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढणार आहे. हा मोर्चा हा सरकारला जाग करण्याच्या दृष्टिकोनातून काढण्यात येणार आहे. हा मोर्चा ऐतिहासिक मोर्चा असणार असल्याचे एसटी कामगार नेते उत्तम पाटील यांनी सांगितले आहे.
अहवाल देण्यासाठी त्रिसदस्य कमिटीला मुदतवाढ -
वेतन, एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण यासह विविध मांगण्यासाठी संप पुरकारेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात स्थापन केलेल्या त्रिसदस्यीय समितीचा अहवाल अंतिम टप्प्यात आहे. मात्र, अद्याप पूर्ण झालेला नाही. त्यामुळे अहवाल सादर करण्यासाठी मुदतवाढ देण्याची राज्य सरकारची विनंती शुक्रवारी उच्च न्यायालयाकडून मान्य करण्यात आली. सरकारला 18 फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ न्यायालयाने दिली आहे. तसेच समितीने अहवालातील सुचना आणि मुख्यमंत्र्यांचा अभिप्राय हा सीलबंद लिफाफ्यात सादर करावा, असे निर्देशही खंडपीठाने यावेळी राज्य सरकारला दिले. तर याचिकेवरील पुढील सुनावणी 22 फेब्रुवारीला निश्चित केली गेली आहे.
हेही वाचा -IPL Auction 2022 : पहिल्या दिवशी 162 खेळाडूंसाठी लागणार बोली, मुंबईकर श्रेयससाठी १२.२५ कोटींचा लिलाव