कोल्हापूर- एसटी म्हणजे विश्वास, हे ५० वर्षे राज्यातील प्रवाशांनी अनुभवले आहे. एसटीवरील विश्वासहर्ता कर्मचाऱ्यांनी टिकवून ठेवली आहे. त्यामुळे आज कोल्हापूर विभागातील एसटीतून मालवाहतूक करण्यास सुरुवात केली आहे. यात नक्की एसटी महामंडळ यशस्वी होईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला. आज कोल्हापूर राज्य परिवहन विभागाच्यावतीने मालवाहतूक एसटी बसची सुरवात करण्यात आली. त्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते.
पुढे बोलताना मंत्री पाटील म्हणाले, राज्यात अशा ३५० मालवाहतूक बस सुरू करण्यात येणार आहेत. तर कोल्हापूर जिल्ह्यात ११ बस वाहतूक सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे सरकारी कामकाज, बालभारती सारख्या कामांना वेग येईल, असा विश्वास परिवहन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी व्यक्त केला.