कोल्हापूर -कोल्हापूर जिल्ह्यात पहिल्या आणि दुसर्या टप्प्यातील लसीकरणाला अल्प प्रतिसाद मिळाला आहे. मात्र आता तिसऱ्या टप्प्याला नागरिकांमधून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत आहे. अवघ्या दोन दिवसांमध्येच जिल्ह्यात अडीच हजारांहून अधिक नागरिकांनी लस घेतली आहे. तिसऱ्या टप्प्यात 60 वर्षांवरील जेष्ठ नागरिक आणि 45 ते 60 वयोगटातील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येत आहे. जिल्ह्यात एकूण 120 ठिकाणी लसीकरण सुरू आहे. त्याला नागरिकांमधून चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक सुनील माळी यांनी म्हंटले आहे.
लसीकरण आणि प्रशासनाचे उत्तम नियोजन
पहिल्या दोन टप्प्यांमध्ये लसीकरणाबाबत फारसा उत्साह पाहायला मिळाला नाही. तिसऱ्या टप्प्यात मात्र पहिल्याच दिवसापासून नागरिक स्वतःहून पुढे येऊन लस घेत आहेत. विशेष म्हणजे प्रशासनाकडून सुद्धा लसीकरणाची जय्यत तयारी करण्यात आली आहे. जवळपास शहरासह जिल्ह्यातील 120 सरकारी केंद्रांवर लसीकरण मोहीम पार पडत आहे. याचे नेटकं नियोजन प्रशासनाकडून करण्यात आले असल्याने नागरिकांमधून सुद्धा समाधान व्यक्त होत आहे. शहरात उत्तम सोय तर आहेच शिवाय गावोगावी सुद्धा जेष्ठांना आरोग्य केंद्रांपर्यंत नेण्यासाठी सोय करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर मास्क, सॅनिटायझर बरोबरच निरीक्षण कक्ष सुद्धा बनवण्यात आला आहेत. त्यामुळेच चांगल्या पद्धतीने प्रतिसाद मिळत आहे. मिळालेला प्रतिसाद पाहता तिसऱ्या टप्प्यात जास्तीत जास्त नागरिक लस घेतील असा प्रशासनाला विश्वास आहे.
तिसऱ्या टप्प्यात 'इतके' लाभार्थी :