महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wedding card viral : हटके लग्नपत्रिका गावभर व्हायरल; नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं.... - हटके लग्नपत्रिका गावभर व्हायरल

कोल्हापूरात नेहमीच काही ना काही हटके पाहायला मिळते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून आता एक अशी लग्नपत्रिका व्हायरल ( Wedding card viral ) झाली आहे. ज्यामध्ये अगदी हटके आणि कोल्हापूरी स्टाईलमध्ये मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण ( wedding invitation was given ) देण्यात आले आहे.

Wedding card viral
हटके लग्नपत्रिका गावभर व्हायरल

By

Published : Nov 21, 2022, 12:52 PM IST

Updated : Nov 21, 2022, 2:38 PM IST

कोल्हापूर :कोल्हापूरात नेहमीच काही ना काही हटके पाहायला मिळते. याचीच प्रचिती पुन्हा एकदा आली असून आता एक अशी लग्नपत्रिका व्हायरल ( Wedding card viral ) झाली आहे. ज्यामध्ये अगदी हटके आणि कोल्हापूरी स्टाईलमध्ये मित्रपरिवाराला लग्नाचे आमंत्रण देण्यात ( wedding invitation was given ) आले आहे. सुमित आणि श्वेता असे या नव्या जोडीचे नाव असून येत्या 27 नोव्हेंबर रोजी त्यांचे कोल्हापूरात लग्न होत आहे. त्यांच्या याच लग्नाची निमंत्रण पत्रिका आता गावभर व्हायरल झाली आहे.

हटके लग्नपत्रिका गावभर व्हायरल



काय म्हंटले आहे लग्नपत्रिकेत ?कोल्हापूरातील रांगडी भाषा या लग्न पत्रिकेतून दिसून आली आहे. ज्यामध्ये आमंत्रण देताना म्हंटले आहे की, 26 नोव्हेंबर ला म्हणजेच शनवारी 4 वाजता साखरपुडा हाय आणि सांच्याला 7 वाजता हळदी.. डीजे तेन सांगिटलाय. लोळून नाचूया.. तुम्ही फक्त वेळ काढून या.. 27 नोव्हेंबरला म्हणजे रव्वारी 1 वाजून मिंटाचा मुहूर्त काढलाय भडजीनं लग्नाचा. नाटकं सांगायची न्हाईत. गपगुमान यायचं. खर्च बी ढीग केलाय त्यामुळं इषयच न्हाई. जेवणा बिवनाची सोय हाय.. पत्ता माहित्या न्हवं ? पद्मपरी हॉल कळंब्यातला.. कत्यानीला जाताना ओ.. हा तिथंच हाय लगीन.. या बघा 100 टक्के वाट बघतो. आहेर काय आणू नका..

Last Updated : Nov 21, 2022, 2:38 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details