कोल्हापूर - घरगुती कारणावरुन दारूच्या नशेत मुलाने आईचा खून केल्याची घटना गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे गावात घडली. खून करून मुलगा फरार झाला असून त्याचा तपास सुरू आहे. विनायक शंकर जावळे (वय-30) असे आरोपीचे नाव असून सुनंदा शंकर जावळे (वय-65) असे मृत महिलेचे नाव आहे.
कोल्हापुरात दारुच्या नशेत मुलाकडून आईची हत्या - आईचा खून
गडहिंग्लज तालुक्यातील वडरगे गावात मुलाने आईचा खून केल्याची घटना घडली. विनायक शंकर जावळे (वय-30) असे आरोपीचे नाव असून सुनंदा शंकर जावळे (वय-65) असे मृत महिलेचे नाव आहे.
![कोल्हापुरात दारुच्या नशेत मुलाकडून आईची हत्या Representative Image](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6449685-thumbnail-3x2-murderimage.jpg)
हेही वाचा -जोतिबाची चैत्र यात्रा रद्द; कोल्हापूरातील मंदिर, मशीद, चर्चसुद्धा दर्शनासाठी बंद
आरोपी विनायकला दारूचे व्यसन आहे. त्याचे घरातील इतर दोन सदस्यांबरोबर सतत वाद होत असत. यात्रेसाठी आलेल्या पाहुण्यांनी विनायकला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र दारूच्या नशेत त्याला काही समजले नाही. संध्याकाळी आठच्या दरम्यान घरी आलेले पाहुणे देवदर्शनासाठी बाहेर गेल्यानंतर विनायक आणि त्याच्या आईचा पुन्हा वाद झाला. संतापलेल्या विनायकने घरातील सोफ्याच्या लाकडी पट्टीने आईच्या डोक्यात घाव घातला यामध्ये त्यांचा जागीच मृत्यू झाला. विनायक जावळे याच्यावर गडहिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.