कोल्हापूर - आपण यापूर्वी लाकडाच्या, कागदाच्या चप्पलापासून सोन्याच्या चप्पल सुद्धा पाहिल्या असतील. इतकेच नाहीतर, कोल्हापूर म्हटल्यावर चटकन आठवते ती कोल्हापुरी चप्पल. पण, आता यात भर म्हणून चक्क गाईच्या शेणापासून एका कोल्हापूरकराने बनवलीय. विश्वास बसणार नाही पण हे खरं आहे. या चपला विक्रीसाठी देखील आल्या आहेत. या शेणापासून बनवलेल्या चपला कशा फायदेशीर ठरतात? याबाबत पाहुयात एक विशेष रिपोर्ट...
कोल्हापुरातील किरण माळी यांची टोटल ड्रीम सर्व्हिसेस कंपनी आहे. त्याच कंपनीमध्ये ते शेणापासून चपला तयार करतात. त्या चपलेला त्यांनी 'गोमय चरण पादुका', असे नाव दिले आहे. वैज्ञानिकदृष्ट्या शेणाचे अनेक फायदे आहेत. शेणापासून बनवलेल्या या चपला पायात घातल्यानंतर अनेक आजारांपासून सुटका मिळते, असा दावा देखील माळी यांनी केला आहे. यामध्ये आपला रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच मानसिक ताण सुद्धा दूर होत असल्याचा दावा त्यांनी केला.