कोल्हापूर Shrikant Shinde On Shasan Aplya Dari:राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी 'शासन आपल्या दारी' ( Shasan Aplya Dari Yojana) कार्यक्रमाची श्वेतपत्रिका काढा अशी मागणी केली आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या कार्यक्रमात अनेक कंत्राटदारांकडून कार्यक्रमासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आरोपही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून होत आहे. याबाबत विचारलं असता श्रीकांत शिंदे म्हणाले की, राज्य शासनाच्या योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातील जनतेच्या घराघरात आणि मनामनात घेऊन जात आहेत. यामुळंच विरोधकांच्या पोटात दुखत आहे. या कारणाने असले आरोप होत आहेत. मात्र 'शासन आपल्या दारी' योजनेच्या धर्तीवर पंजाब सरकारनेही अशी योजना राज्यात लागू केली आहे. हेच या योजनेचं यश आहे. 'शासन आपल्या दारी' योजनेतून गेल्या सात महिन्यात राज्यातील 2 कोटी जनतेला लाभ मिळाल्याचंही शिंदे यांनी यावेळी सांगितलं.
यापूर्वीचं सरकार अडीच वर्ष घरात बसून: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावर रुजू झाल्यानंतर त्यांच्या कामाचा सपाटा तुम्ही पाहिला आहे. शासन आपल्या दारी योजना त्यांनी गोरगरिबांच्या घरात पोहोचवली, यापूर्वीचं सरकार अडीच वर्ष घरात कुलूप लावून बसलं होतं, असा हल्लाबोलही खासदार शिंदे यांनी महाविकास आघाडीवर केला.