कोल्हापूर- जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या हळूहळू वाढत असतानाच जिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोरोना प्रतिबंधक लसीचा साठा शिल्लक आहे. बुधवारी सांगली जिल्ह्यातून पाच हजार डोस मागवण्यात आले आहेत. दरम्यान, ज्येष्ठ नागरिकांनी लसीकरणाला पुढे यावे, असे आवाहन आरोग्य अधिकारी डॉ. आरती मोकळे यांनी केले आहे.
जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या स्थिर आहे. बुधवारी 46 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली असून त्याची संख्या आता 337 वर पोहोचली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 51 हजार 152 रुग्णांना कोरोनाची लागण झाली होती. त्यातील 1752 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर आत्तापर्यंत एकूण 49 हजार पेक्षा जास्त रुग्णांना उपचार घेऊन घरी सोडण्यात आले आहे. सध्या कोल्हापूर जिल्ह्यात 337 रुग्ण उपचार घेत आहेत.
जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा तुटवडा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, आतापर्यंत 2 लाखांवर डोसचे वितरण-कोल्हापूर जिल्ह्यात 16 फेब्रुवारी पासून कोरोना प्रतिबंधक लसीकरणाला सुरुवात झाली. आतापर्यंत आरोग्य कर्मचारी शासकीय कर्मचारी यांना कोरोनाची लस देण्यात आली, तर ज्येष्ठ नागरीक, मधुमेह असणाऱ्यांना कोव्हीशिल्ड लस देण्यास सुरुवात झाली आहे. आत्तापर्यंत जिल्ह्यात दोन लाख 510 कोरोना प्रतिबंधक लस वितरित केली आहे. दरम्यान नागरिकांनी लसीकरणाला घाबरून न जाता लस घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अधिष्ठाता डॉक्टर आरती मोकडे यांनी केले आहे.
दोन दिवस पुरेल इतकाच साठाजिल्ह्यात केवळ दोन दिवस पुरेल इतकाच कोव्हिड प्रतिबंधात्मक लसीचा साठा शिल्लक आहे. बुधवारी सायंकाळी सांगली जिल्ह्यातून 5000 डोस मागवण्यात आले आहेत. जिल्ह्यात सुरुवातीपासून कोव्हीशिल्ड लसीचे डोस देण्यात येत आहेत. मात्र आता पुढच्या काळात कोव्हॅक्सीनचे डोस देण्यात येणार आहेत. त्यामुळे ज्यांना पहिला कोव्हीशिल्डचा डोस दिला आहे, त्यांना पुन्हा कोव्हीशिल्डचाच दुसरा डोस देणे बंधनकारक आहे. त्यामुळे 43 हजार 574 डोसची मागणीत शासनाकडे केली आहे. पुढील दहा दिवसांसाठी एवढा साठा आवश्यक असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.
आतापर्यंत वितरित झालेल्या डोसची आकडेवारी(२०२१)१३ जाने-३७,५८०२५ जाने- ३१५००२२ फेब्रु- २५८००२ मार्च- ४०५००१० मार्च- ५१०००१२ मार्च- १३०००१५ मार्च- ५०००
एकूण- २ लाख ४८०एकूण वितरित- २ लाख ५१०शिल्लक- ३८७०