कोल्हापूर -उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मुंबईमध्ये राहणाऱ्या उत्तरप्रदेशच्या नागरिकांच्या न्याय हक्कासाठी मुंबईमध्ये कार्यालय सुरू करणार असल्याचे जाहीर केले. हे कार्यालय उत्तर प्रदेशच्या लोकांना सामाजिक सुरक्षा निश्चित करण्यासाठी तसेच राज्यात गुंतवणूक करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी असणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, या निर्णयाला विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांनी कडाडून विरोध केला आहे. अशाप्रकारे जर आदानप्रदान करायचे प्रयत्न होत असतील तर आम्ही देखील प्रत्येक राज्यात महाराष्ट्र भवन उभे करू, असा इशारा निलम गोऱ्हे यांनी दिला आहे.
.. तर आम्ही ही प्रत्येक राज्यात मराठी भवन उभे करू - उपसभापती नीलम गोऱ्हे - कोल्हापूर नीलम गोऱ्हे इतर राज्यात मराठी भवन
महाराष्ट्र सरकार देखील मराठी लोकांसाठी प्रत्येक राज्यात मराठी भवन उभा करेल. लखनऊ, हिमाचल प्रदेश सर्वत्र आम्ही भवन उभा करू यासाठी आम्ही जागा देखील पाहून आलो आहोत. यामुळे चांगलाच प्रघात होईल. त्यांचा हेतू हा चांगला असायला हवा मुंबईची चित्रनगरी उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा काही तरी चुकीचा दूजाभाव पसरवायचा असे करण्यापेक्षा योगिनी तिथेच एक वसाहत बांधून येथील त्यांच्या लोकांना घेऊन जावं आणि तेथेच थांबवाव असा सल्ला ही निलम गोऱ्हे यांनी दिला आहे.
तर आम्ही ही प्रत्येक राज्यात भवन काढू -उत्तर प्रदेश के कार्यालय मुंबई ध्ये सुरू करण्याच्या घोषणेनंतर महाराष्ट्र सरकारमधील नेत्यांनी यास विरोध करताना पाहायला मिळत आहे याबाबत विधान परिषदेचे उपसभापती नीलम गोरे यांना विचारले असता या वेळी बोलताना ते म्हणाले, अशाप्रकारे परराज्यातील सरकारने महाराष्ट्रात येऊन कार्यालय उभं करत असेल तर महाराष्ट्र सरकार देखील मराठी लोकांसाठी प्रत्येक राज्यात मराठी भवन उभा करेल. लखनऊ, हिमाचल प्रदेश सर्वत्र आम्ही भवन उभा करू यासाठी आम्ही जागा देखील पाहून आलो आहोत. यामुळे चांगलाच प्रघात होईल. त्यांचा हेतू हा चांगला असायला हवा मुंबईची चित्रनगरी उत्तर प्रदेश मध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न करायचा काही तरी चुकीचा दूजाभाव पसरवायचा असे करण्यापेक्षा योगिनी तिथेच एक वसाहत बांधून येथील त्यांच्या लोकांना घेऊन जावं आणि तेथेच थांबवाव असा सल्ला ही त्यांनी दिला आहे. आदान प्रधान हे विचारांचे करायला हवं असे ही ते म्हणाले आहेत.
नदीमधील गाळ काढण्यासाठी ग्रामपंचायत व पर्यावरण प्रेमींनी पुढे यावे -विधान परिषदेचे उपभापती नीलम गोऱ्हे पूर परिस्थिती संदर्भात आढावा घेतला. तसेच प्रशासनास काही सूचना देखील केल्या असून आपत्ती काळात लोकांना शासकीय माहिती कळावी यासाठी तयार करण्यात आलेल्या पब्लिक अॅड्रस सिस्टीमचे त्यांनी तोंड भरून कौतुक ही केले आहे. तसेच अशी यंत्रणा दुसऱ्या जिल्ह्यात ही राबविण्यास प्रशासनास मदत करावी सांगितले आहे. तर पंचगंगा नदीमध्ये प्रचंड प्रमाणात गाळ तयार झाले आहे. यामुळे नदीपात्र हे छोटे झाले असून काही प्रमाणात पाऊस पडले की लगेच पाणी पात्राबाहेर येत आहे यामुळे नदी मधील गाळ काढणे हे गरजेचे आहे मात्र यास हरिद लवादा परवानगी देत नाहीय. पण हे आपत्ती विषयक प्रकरण असून जर काढला नाही तर आपत्ती वाढू शकते यामुळेच आपत्ती व्यवस्थापनाचा भाग म्हणून ग्रामपंचायतींनी व पर्यावरण प्रेमींनी गाळ काढण्यासाठीचे पत्र हे खासदार व जिल्हाधिकार्यांना द्यावे त्यानुसार आम्ही हरित लवाद अशी बोलणे करून जर त्याच गावातील गाव काढले तर नदीचे पाणी हे पात्रा येणार नाही असे ते म्हणाले आहेत. तसेच जयंती नाल्या संदर्भात ही महानगरपालिकेने स्वच्छता करावी तसेच पात्रा मध्ये येणाऱ्या अनधिकृत बांधकामांवर ही कारवाई करावी, असे सांगितले असल्याचे नीलम गोरे यांनी सांगितले.