महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

गतवेळच्या निवडणुकीत ज्यांच्यामुळे दगाफटका झाला त्या लोकांचा बंदोबस्त करा - संजय पवार - गट प्रमुख

पण विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आणि नूतन शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची उपस्थिती नसल्याने सभास्थळी चर्चेला उधाण आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा कोल्हापूर शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली.

गतवेळच्या निवडणुकीत ज्यांच्यामुळे दगाफटका झाला त्या लोकांचा बंदोबस्त करा - संजय पवार

By

Published : Mar 13, 2019, 11:19 PM IST

कोल्हापूर - गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेची सीट थोडक्या मतांनी हुकली. हे कोणामुळे झाले याचा अभ्यास करण्याची गरज आहे. आशा लोकांचा बंदोबस्त करून त्यांच्यावर लक्ष ठेवा, अशी सूचना शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी आज परिवहनमंत्री दिवाकर रावते यांना केली.

गतवेळच्या निवडणुकीत ज्यांच्यामुळे दगाफटका झाला त्या लोकांचा बंदोबस्त करा - संजय पवार

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेना गट प्रमुख व बीएलए यांचा मेळावा पार पडला, यावेळी ते बोलत होते. कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील सर्वच पदाधिकारी या मेळाव्याला उपस्थित होते. पण विद्यमान आमदार राजेश क्षीरसागर आणि नूतन शहरप्रमुख रविकिरण इंगवले यांची उपस्थिती नसल्याने सभास्थळी चर्चेला उधाण आले. ऐन निवडणुकीच्या तोंडावर सुद्धा कोल्हापूर शिवसेनेमध्ये असलेली गटबाजी पुन्हा एकदा समोर आली.

आमदार राजेश क्षीरसागर आणि जिल्हाप्रमुख संजय पवार यांचे वेगवेगळे गट आहेत हे सर्वांना चांगलेच माहीत आहे. पण आज लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या गट प्रमुख व बीएलए यांच्या मेळाव्यात सुद्धा ही गटबाजी दिसून आल्याची चर्चा सुरू होती. दरम्यान, जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी गतवेळच्या लोकसभा निवडणुकीत संजय मंडलिक यांचा मोजक्याच मतांनी पराभव झाल्याचे सांगत त्याला जबाबदार पक्षातील काही मंडळीच असल्याचे म्हटले. पण यावेळच्या निवडणुकीत पुन्हा तसा दगा फटका बसू नये यासाठी अशा लोकांना ताकीद देण्याची सूचना संजय पवार यांनी परिवहन मंत्री दिवाकर रावते यांना कोणाचेही नाव न घेता केली. शिवाय स्थानिक स्तरावर जी काही किरकोळ वादावादी असते ती निवडणुकीवेळी बाजूला ठेवणे गरजेचे आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी साटेलोटे करून राजकारण करणाऱ्यांवर लक्ष ठेवा. वेळ आल्यावर आशा लोकांची नावे मी जाहीररित्या सांगणार असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले. दरम्यान रावते यांनी आमदार राजेश क्षीरसागर मुंबईमध्ये असल्याचे सांगत उलट सुलट चर्चांचे खंडन केले.

ABOUT THE AUTHOR

...view details