कोल्हापूर : सध्या सीमा प्रश्न चांगलाच पेटला ( MH KN Border Dispute ) आहे. कर्नाटकात महाराष्ट्रातील एसटींना बंदी घातल्याची बातमी कळताच कोल्हापुरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ( Shiv Sena Uddhav Balasaheb Thackeray party ) वतीने कोल्हापुरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरात अचानक मोर्चा काढण्यात आला आहे.
Border Dispute : कर्नाटक बसेसवर 'जय महाराष्ट्र' लिहीत वाहतूक बंद करण्याचा इशारा - कोल्हापूर
कर्नाटकच्या बसेसला कोल्हापुरात प्रवेश देऊ नका, या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहीत ( writing Jai Maharashtra on Karnataka buses ) कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध केला.
जय महाराष्ट्र लिहीत केला निषेध -कर्नाटकच्या बसेसला कोल्हापुरात प्रवेश देऊ नका, या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने कर्नाटकच्या बसेसवर जय महाराष्ट्र लिहीत कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचा निषेध केला. दरम्यान, कर्नाटकच्या वतीने महाराष्ट्रातील एसटीला कर्नाटकात प्रवेश बंदी केल्याने उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते आज आक्रमक होत कोल्हापूर येथील एसटी डेपो मध्ये लावण्यात आलेल्या कर्नाटकच्या बसवर जय महाराष्ट्र लिहीत कर्नाटकच्या बसेसला महाराष्ट्रात बंदी घालावी, अशी मागणी केली आहे.
मुख्यमंत्र्यांच्या दाव्यानंतर वाद पेटला -कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र राज्यातील सांगली जिल्ह्यातील जत तालुका आणि सोलापूर आणि अक्कलकोट या गावांवर कर्नाटकचा दावा केला यानंतर गेल्या दोन दिवसापासून महाराष्ट्रात वाद पेटला आहे. या वक्तव्याविरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आक्रमक झाले असून कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि विरोधात निषेध व्यक्त केला जात आहे.