कोल्हापूर- राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी एनडीएसोबत यावे, असा सल्ला रामदास आठवलेंनी दिला आहे. केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपल्या खास शैलीत टीका केली.
यावेळी बोलताना ते म्हणाले, राहुल गांधी यांनी उलट-सुलट बोलून मते घालवली आहेत. त्यामुळे त्यांना आता तोंड दाखवायला देखील जागा राहिली नाही. प्रकाश आंबेडकरांनीही वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास एनडीएमध्ये यावे. प्रकाश आंबेडकर हे वंचितांना सत्तेपासून दूर ठेवत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला.