महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं! कुणी करणार का? - जयंत पाटलांची मुख्यमंत्रीपदाची इच्छा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतय या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यावर पवार म्हणाले मग त्यात काय झालं. त्यांना शुभेच्छा...

sharad pawar
शरद पवार

By

Published : Jan 22, 2021, 9:43 AM IST

कोल्हापूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मलाही मुख्यमंत्री व्हावं वाटतय या इच्छेवर पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी मिश्किल प्रतिक्रीया दिली आहे. त्यांना प्रश्न विचारण्यात आला की जयंत पाटील यांना मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. त्यावर पवार म्हणाले मग त्यात काय झालं. त्यांना शुभेच्छा...ते एवढ्यावर थांबले नाहीत त्यांनी पाटलांची फिरकी घेत उद्या मलाही वाटेल मुख्यमंत्री व्हावं, कोणी करणार का? असे सांगत एक सुचक इशारही दिला. ते कोल्हापूरमध्ये बोलत होते.

काय म्हणाले होते जयंत पाटील

मलाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटते,अशी सुप्त भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केली आहे. तसेच दीर्घकाळ राजकारणात काम करणाऱ्या कुणालाही मुख्यमंत्री व्हावेसे वाटू शकते, मलाही तसे वाटणे स्वाभाविक आहे, पण शरद पवारांचा निर्णय हा आमच्या दृष्टीने अंतिम आहे, असे मंत्री जयंत पाटील यांनी स्पष्ट केले.ते सांगलीच्या इस्लामपूर मध्ये मुलाखती दरम्यान बोलत होते.

मी असं म्हंटलच नाही -

राजकीय वर्तुळातील चर्चा पाहता मी असे म्हंटलच नसल्याचे सांगत जयंत पाटील यांनी यूटर्न घेतला आहे. मुख्यमंत्री व्हायला आवडेल का? असा प्रश्न मला विचारण्यात आला होता. त्यावर मी केलेल्या वक्तव्याचा विपर्यास करत संबंधित वाहिनेने वृत्त दाखवले, असे स्पष्टीकरण जयंत पाटील यांच्याकडून देण्यात आले. तसेच आमच्याकडे संख्याबळ ही कमी आहे शिवाय राष्ट्रवादीत कोणताही निर्णय केवळ शरद पवार हेच घेत असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

अजित पवार सुप्रिया सुळेंचा पाठींबा

जयंत पाटलांच्या मुख्यमंत्रीपदासाठी अजित पवारांनीही पाठिंबा दिली होता. त्यानंतर सुप्रिया सुळे यांचीही प्रतिक्रीया आली आहे. अजित पवारांचा जयंत पाटील मुख्यमंत्री व्हावे, यासाठी पाठिंबा असेल तर आमचा पाठिंबा नसण्याचे कारण नाही. आपल्या पक्षाचा, आपल्या विचारांचा मुख्यमंत्री व्हावा, अशी इच्छा असण्यात गैर काय? अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीच्या नेत्या व खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली आहे.

काय वाटतंय याने काहीही होत नाही -

तर तिथेच महाविकास आघाडी ही एक दिलाने काम करत आहे. कोणाला काय वाटतंय याने काहीही होत नाही, असा चिमटा शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी काढला. जयंत पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाची ओढाताण सुरू होणार का? अशा चर्चा मात्र सुरू झाल्या आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चढाओढीतून महाराष्ट्रात कधी नव्हे ते विभिन्न विचारसरणीचे लोक एकत्र येत सरकार स्थापन झाले असल्याचेही सावंत म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details