कोल्हापूर -मोदी-शहा हे देशासाठी घातक आहेत, हे सर्वांना सांगायचा एककलमी कार्यक्रम राज ठाकरे यांचा आहे. जे चुकीचे चालले आहे, ते प्रभावीपणे मांडतात. आपल्या भाषणांमध्ये उदाहरणांसह जे मुद्दे राज ठाकरे दाखवत आहेत, ते अत्यंत प्रभावी ठरत आहे. त्यांच्या या मांडणीचा नक्कीच फायदा होणार आहे. मात्र, राज ठाकरे आणि आम्ही निवडणुकीत एकत्र नाही, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिले. ते कोल्हापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
शरद पवार म्हणाले, नरेंद्र मोदींनी आश्वासने पाळली नाहीत. यामुळे लोकांमध्ये नाराजी आहे. याला डायव्हर्ट करण्याचा प्रयत्न मोदींच्याकडून केला जात आहे. सैन्याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न करू नये. ही भूमिका आत्तापर्यंतच्या सरकारांनी घेतली होती. परंतु, हे सरकार त्याला अपवाद आहे. ते स्वतःच्या फायद्यासाठी बोलतात.