महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरेगाव भीमाचा तपास 'एनआयए'ला देणे अयोग्यच; पवार नाराज

पुण्यातील एल्गार परिषद प्रकरणाचा तपास ‘एनआरए’कडे देण्याचा मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निर्णय अयोग्य आहे, असे म्हणत शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

sharad pawar
शरद पवार

By

Published : Feb 14, 2020, 2:30 PM IST

Updated : Feb 14, 2020, 11:18 PM IST

कोल्हापूर-कोरेगाव भीमा हिंसाचाराचा तपास एनआयएकडे सोपविण्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मान्यता दिली आहे. उध्दव ठाकरे यांचा हा निर्णय अयोग्य आहे, असे सांगत राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खासदार शरद पवार यांनी यासंदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.

कोरेगाव भीमाचा तपास 'एनआयए'ला देणे अयोग्यच...

हेही वाचा -निमंत्रण पत्रिकेचा वाद; महापौरांकडून प्रोटोकॉलचा भंग, गुन्हा दाखल करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

गृह खात्याच्या अधिकाऱ्यांची कोरेगाव-भीमा प्रकरणी वागणूक आक्षेपार्ह होती. याची चौकशी करण्यासाठी सरकारने पावले उचलल्यामुळे केंद्राने राज्याकडून तपास काढून घेतल्याचा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. ते कोल्हापुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

हेही वाचा-आरटीईच्या प्रवेशासाठी नवीन शाळांची नोंदणी अद्याप गुलदस्त्यात

गृह खात्याच्या अधिकाऱ्यांबद्दल आलेल्या तक्रारीवरुन सकाळी याबाबत राज्य सरकारने बैठक घेतली आणि सायंकाळी केंद्राने तपास काढून घेतला. राज्याचा अधिकार केंद्राने काढून घेतल्याचा आरोपही शरद पवार यांनी यावेळी केला आहे. शिवाय, राज्य सरकारने या गोष्टीला पाठिंबा देणे हे योग्य नसल्याचे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर भाष्य केले आहे.

हेही वाचा-'देशाची सत्ता २ लोकांच्या हातात, परिवर्तन व्हावं ही तर लोकभावना'

महाराष्ट्रापाठोपाठ दिल्लीतही भाजपला दणका बसला आहे. महाराष्ट्रात सत्ता बदल झाला आता दिल्लीत भाजप सत्तेपासून दूर गेले. परंतु, प्रत्येक राज्यातील परिस्थिती वेगवेगळी आहे. तरीही भाजपच्या विरोधात अनुकूल वातावरण असल्याचे दिसत नाही. त्यामुळे निश्चितपणे भाजपच्या विरोधात जनमत आहे, असे पवार म्हणाले.

Last Updated : Feb 14, 2020, 11:18 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details