कोल्हापूर - महाराष्ट्राचे गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई आज कोल्हापूर दौऱ्यावर होते. सुरुवातीला जोतिबा मंदिर परिसरातील नवरात्रौत्सव बंदोबस्त आणि सुरक्षेची पाहणी केल्यानंतर कोल्हापुरातील आई अंबाबाईचे दर्शन घेऊन येथील सुरक्षेसंदर्भात पाहणी केली.
मंदिर परिसरात असलेल्या हार, ओटी, मूर्ती आदी साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांशी सुद्धा शंभूराजे देसाई यांनी संवाद साधला. मंदिर परिसरात अनेकांचे व्यवसाय आहेत. मात्र, अद्याप मंदिर उघडण्याबाबत शासनाचा कोणताही निर्णय नाही. त्यामुळे अनेक व्यावसायिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी येथील काही व्यवसायिकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.