महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

परवानगी नाकारली तरी राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करणार - समरजित घाटगे - कोल्हापूर जिल्हा बातमी

राधानगरी धरणावर साजऱ्या होणाऱ्या शाहू जयंतीला ऐनवेळी परवानगी नाकारल्याने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे चांगलेच संतापले आहेत. ते म्हणाले, राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी

समरजित  घाटगे
समरजित घाटगे

By

Published : Jun 26, 2021, 4:20 AM IST

Updated : Jun 26, 2021, 6:17 AM IST

कोल्हापूर -राधानगरी धरणावर साजऱ्या होणाऱ्या शाहू जयंतीला ऐनवेळी परवानगी नाकारल्याने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे चांगलेच संतापले आहेत. राजर्षी शाहू महाराजांची जयंती साजरी कराण्यापासून कोणीही रोखू शकत नाही म्हणत आपल्या पत्नीसह शाहू जयंती धरणावर जाऊन साजरी करणार असल्याचे समरजित घाटगे यांनी म्हटले आहे. शिवाय ऐनवेळी परवानगी नाकारल्याने प्रशासनाचा निषेधही घाटगे यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थित शाहू जयंती साजरी करणार असल्याचे समरजित घाटगे यांनी जाहीर केले होते. त्यानुसार शुक्रवारी (दि. 25 जून) राधानगरी धरणावर जाऊन स्वतः घाटगे यांनी तयारीची पाहणी केली होती. मात्र शुक्रवारी सायंकाळी उशिरा परवानगी नाकारण्यात आली असल्याचे समजल्याने त्यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे.

बोलातना समरजित घाटगे

कोणीही शाहू जयंती साजरी करण्यापासून रोखू शकत नाही

शनिवारी (दि. 26 जून) राधानगरी धरण येथे राजर्षी शाहू महाराजांनी जयंती साजरी होणार होती. याच पार्श्वभूमीवर शुक्रवारी समरजित घाटगे यांनी प्रत्यक्ष धरणावर जाऊन तयारीची पाहणी केली. राधानगरी धरण हे शाहूंच्या कार्याचे ज्वलंत उदाहरण आहे. त्यामुळेच हा शाहू जयंती सोहळा राधानगरी धरणावर करण्याचा निर्णय घेतला. इथून पुढे दरवर्षी ही शाहू जयंती एखाद्या सोहळ्याप्रमाणे दिमाखात साजरा केली जाईल. यावर्षी अगदी मोजक्या लोकांच्या संख्येत जयंती सोहळा पार पडणार असला तरी तो अगदी तितक्याच उत्साहाने आणि उत्तमरित्या पार पडायला हवा. यात कोणतीही कसर राहता कामा नये यासाठी स्वतः लक्ष घालून समरजित घाटगे यांनी याची सर्व पाहणी केली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळी प्रशासनाकडून परवानगी नाकारण्यात आल्याचे सांगितल्याने घाटगे यांनी प्रशासनाचा निषेध व्यक्त केला आहे. शिवाय पाच दिवसांपूर्वी प्रशासनाला पत्र दिले होते. मात्र, त्यांता आता जाग आली आहे. त्यामुळे मला शाहू जयंती साजरी करायला कोणीही रोखू शकत नाही, असे म्हणत काय करवाई करायची ते करा,अशी प्रतिक्रिया समरजित घाटगे यांनी म्हंटले आहे.

हेही वाचा -'फडणवीसांच्या काळात ओबीसी आरक्षणाचा बट्ट्याबोळ; आधी भाजपाच्या वाझेंना थांबवा'

Last Updated : Jun 26, 2021, 6:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details