महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ईटीव्ही भारत स्पेशल : कोल्हापूरच्या सीपीआरमध्ये तब्बल 17 व्हेंटिलेटर बंद अवस्थेत.. - corona effect kolhapur news

सीपीआरमध्ये सद्या 54 व्हेंटिलेटर चालू अवस्थेत असून 17 व्हेंटिलेटर बंद आहेत. असे असले तरी प्रत्यक्षात किती टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते, हासुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या जिल्ह्यातील 28 हजार रुग्णांपैकी केवळ 4 ते 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक बीसी केम्पी-पाटील यांनी म्हटले आहे.

ईटीव्ही भारत स्पेशल
ईटीव्ही भारत स्पेशल

By

Published : Sep 6, 2020, 3:19 PM IST

Updated : Sep 6, 2020, 7:36 PM IST

कोल्हापूर -थोरला दवाखाना म्हणून ज्या रुग्णालयाची ओळख आहे. त्या सीपीआरमध्ये सद्या 17 व्हेंटिलेटर बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत चालली आहे. शिवाय दररोज 20 हून अधिक कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू होत आहे. एकीकडे जिल्ह्यात आपत्तीजनक परिस्थिती निर्माण झाली असताना प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे रुग्णांना आपले जीव गमवावे लागले का, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. शिवाय यातून प्रशासनाचा निष्काळजीपणासुद्धा समोर आला आहे. याची आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी गंभीर दखल घेतली असून संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. मात्र, केवळ कारवाई करणे हा उपाय नसून लवकरात लवकर येथील सर्वच नादुरुस्त व्हेंटिलेटर दुरुस्त करून रुग्णांच्या सेवेसाठी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

सीपीआरमध्ये सद्या 54 व्हेंटिलेटर चालू अवस्थेत असून 17 व्हेंटिलेटर बंद आहेत. खरंतर अत्यवस्थ रुग्णांना व्हेंटिलेटरची आवश्यकता असते. मात्र, तेच मिळाले नसल्याने राज्यभरात अनेकांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. असे असले तरी दुसरीकडे प्रत्यक्षात किती रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते यावर एक ईटीव्ही भारतने घेतलेला आढावा.

प्रत्यक्षात किती रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज...

जिल्ह्यात सद्यस्थितीत एकूण रुग्णांची संख्या 28 हजारांवर पोहोचली आहे. त्यातील 18 हजार रुग्ण बरे झाले आहेत तर 850 हुन अधिकांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान ही जरी एक बाजू असली तरी प्रत्यक्षात किती टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते, हासुद्धा एक महत्वाचा प्रश्न आहे. आत्तापर्यंत आढळलेल्या जिल्ह्यातील 28 हजार रुग्णांपैकी केवळ 4 ते 5 टक्के रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज भासत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक बीसी केम्पी-पाटील यांनी म्हटले आहे. म्हणजेच सरासरी जवळपास 1 हजार रुग्णांना आत्तापर्यंत व्हेंटिलेटरची गरज लागली आहे. व्हेंटिलेटर अतिशय अत्यवस्थ परिस्थितीत लावण्याची गरज पडते. यामध्ये सुद्धा इन्वेझिव्ह आणि नॉनइन्वेझिव्ह असे दोन प्रकार असून बहुतांश रुग्णांना दुसऱ्या प्रकारे म्हणजे नॉनइन्वेझिव्हने ऑक्सिजन दिला जातो. मात्र, इन्वेझिव्ह पद्धतीत रुग्णांच्या घशात नळ्या घालण्याची आवश्यकता असते. असे प्रसंग 2 ते 3 टक्के इतकेच असल्याचेही केम्पी-पाटील यांनी म्हटले आहे.

खूप कमी प्रसंगी व्हेंटिलेटरची गरज; अनेक रुग्ण ऑक्सिजन दिल्यानंतर झाले बरे : सीपीआर अधिष्ठाता मस्के
दरम्यान याबाबत सीपीआरचे अधिष्ठाता चंद्रकांत मस्के यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, सीपीआरमध्ये आवश्यक व्हेंटिलेटर उपलब्ध आहेत. सद्या 54 व्हेंटिलेटर सुरू अवस्थेत आहेत. मात्र, बंद असलेल्या 17 व्हेंटिलेटरमध्येसुद्धा किरकोळ बिघाड आहे. ते तत्काळ दुरुस्त करून घेण्यात येणार आहेत. मात्र, एकूणच परिस्थितीचा विचार करता अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागत नाही. ज्यांची ऑक्सिजन लेव्हल खाली येते त्यांना ऑक्सिजन देण्यात येतो. यामध्ये अनेक रुग्ण बरे झाले आहेत. मोजक्याच रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागते. सद्या सीपीआरमधील एकूण 316 रुग्णांपैकी केवळ 5 रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज लागली असून त्यांना व्हेंटिलेटर पुरविण्यात आले आहेत. म्हणजेच 54 मधल्या 5 व्हेंटिलेटरवर सद्या रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे बंद व्हेंटिलेटरमुळे आत्तापर्यंत मृत्यू झाल्याचा प्रसंग सीपीआरमध्ये घडला नसल्याचेही त्यांनी सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात असे अनेक प्रसंग घडल्याची उदाहरणे आहेत. अनेकांनी बेडच मिळाला नसल्याची तक्रार केली होती.

वेळेत खाट न मिळाल्यास उद्भवू शकते गंभीर परिस्थिती

अनेक रुग्ण लक्षणे असून सुद्धा घरातच उपचार घेत आहेत. शिवाय काहीजण आपला रिपोर्ट पॉझिटिव्ह येईल म्हणून कोरोना चाचणीसुद्धा करून घेत नाहीयेत. मात्र, असे न करता कोणतेही लक्षण आढळल्यास तत्काळ कोरोना चाचणी करून त्यावर उपचार घ्यावेत. असे न केल्यास प्रसंगी रुग्णांची तब्येत अचानक बिघडू शकते. शिवाय ऐनवेळी खाट उपलब्ध झाली नाही किंव्हा उपचारास दिरंगाई झाली तर, परिस्थिती गंभीर होऊ शकते. प्रसंगी रुग्णाचा मृत्यूसुद्धा होण्याची शक्यता आहे.

Last Updated : Sep 6, 2020, 7:36 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details