कोल्हापूर -कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने अनेक उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील 15 निवारागृहांमध्ये राज्यातील 209 आणि परराज्यातील 577 अशा एकूण 786 जणांचे संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे. आणखी 8 निवारागृहे तयार ठेवण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
15 निवारागृहांची माहिती आणि आकडेवारी पुढीलप्रमाणे -
कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र -
1) शेठ रुईया विद्यालय, मंगळवार पेठ - राज्यातील 22 परराज्यातील 4 अशा 26 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.
2) रामकृष्ण हॉल, लोणार वसाहत - राज्यातील 20 परराज्यातील 8 अशा 28 जणांचा समावेश असून याची क्षमता 50 जणांची आहे.
3) मुलींची शाळा क्र. 6 लाईन बाजार - परराज्यातील 7 असून याची क्षमता 25 जणांची आहे.
करवीर तालुका -
1) सरस्वती मंगल कार्यालय उजळाईवाडी येथे राज्यातील 2 परराज्यातील 35 एकूण 37 जण असून क्षमता 70 जणांची आहे.
2) डी. फार्मसी कॉलेज उजळावाडी - राज्यातील 8, परराज्यातील 24 असे एकूण 32 असून याची एकूण क्षमता 50 जणांची आहे.
कागल तालुका -
1) डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृह कागल - राज्यातील 3 परराज्यातील 96 असे एकूण 100 जण असून क्षमता 113 जणांची आहे.
2) जयसिंगराव घाटगे विद्यालय - राज्यातील 3 परराज्यातील 88 असे एकूण 91 जण असून क्षमता 100 जणांची आहे.
हातकणंगले तालुका -
1) घुगरे सर यांचे निवासी गुरुकुल, वडगाव - परराज्यातील 84 जण असून क्षमता 100 जणांची आहे.
2) अशोकराव माने ग्रुप वाठार तर्फ वडगाव - राज्यातील 2 परराज्यातील 107 असे एकूण 109 जण असून क्षमता 115 जणांची आहे.
3) शहरी बेघर निवारा केंद्र इचलकरंजी - राज्यातील 43 परराज्यातील 8 एकूण 51 जण असून क्षमता 55 जणांची आहे.
4) राजीव गांधी भवन इचलकरंजी - राज्यातील 64 जण असून क्षमता 70 जणांची आहे.