कोल्हापूर - कोल्हापूर महानगरपालिकेने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चौका-चौकात रॅपिड अँटीजेन टेस्ट मोहिमेला सुरुवात केली आहे. रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांची टेस्ट सुरू केल्याने पॉझिटिव्ह रुग्ण सापडत आहेत. ईटीव्ही भारतच्या कॅमेऱ्यामधून आपण पाहू शकता या मोहिमेत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण कसा सापडला.
कोल्हापूर शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिका आयुक्त कादंबरी बलकवडे यांच्या आदेशानुसार शहरातील भाजी मंडई, गर्दीचे ठिकाण आणि चौकाचौकात रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरुवात केली आहे. आतापर्यंत जवळपास ५७० जणांची टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये आत्तापर्यंत जवळपास 37 जण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली आहे.