कोल्हापूर - नेहमी मुलांच्या किलबीलाटाने गजबजलेल्या शाळा लॉकडाऊनमुळे ओस पडल्या आहेत. हसणं, खेळणं, बागडणं, भांडणं, या सर्वांच्या साक्षी असलेल्या शाळेच्या भिंती आज एकट्या पडल्या आहेत. नेमके हेच सांगणारा 'हरवली पाखरे' हा भावुक व्हिडिओ कोल्हापुरातील पन्हाळ्यातील संजीवन विद्यानिकेत शाळेच्या पी. आर. भोसले यांनी शेअर केला आहे.
'हरवली पाखरे' शाळेच्या संस्थापकांनी शेअर केला भावनिक व्हिडिओ ; विद्यार्थ्यांना केलं 'हे' आवाहन - news in kolhapur
'हरवली पाखरे' हा भावुक व्हिडिओ कोल्हापूरतील पन्हाळ्यातील संजीवन विद्यानिकेत शाळेच्या पी. आर. भोसले यांनी शेअर केला आहे.
'हरवली पाखरे' शाळेच्या संस्थापकांनी शेअर केला भावनिक व्हिडीओ ; विद्यार्थ्यांना केलं 'हे' आवाहन
या व्हिडिओमध्ये ते शाळेच्या प्रत्येक भागात जाऊन सुनी झालेली शाळा पाहतायेत. शाळेत मुलांची किलबिल, भांडणे आठवतायेत. सध्या शाळेत एकही विद्यार्थी दिसत नाही. मात्र, एरवी मुलांचा किती किलबिलाट असायचा हे सुद्धा दाखविले आहे. शिवाय याच व्हिडिओमध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना घरीच राहा आपण पुन्हा भेटणार आहोत, असा विश्वास देत कोरोनासंदर्भात प्रबोधन सुद्धा केले आहे. अशीच काहीशी परिस्थिती आज देशातील अनेक शाळेच्या शिक्षकांची सुद्धा झाली असेल यात शंका नाही.