कोल्हापूर - मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरात आंदोलनं सुरू आहेत. आता शालेय विद्यार्थी देखील या आंदोलनात उतरले आहेत. कोल्हापुरात आज शालेय विद्यार्थ्यांनी दंडवत मोर्चा काढला. मात्र, शालेय विद्यार्थ्यांनी दंडवत घालणे योग्य नसल्याचे सांगत पोलिसांनी विद्यार्थ्यांसह आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.
मराठा आरक्षण: कोल्हापुरात शालेय विद्यार्थ्यांचे दंडवत आंदोलन - कोल्हापूर मराठा विद्यार्थी आंदोलन
मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयात तात्पूरती स्थगिती मिळाली आहे. यानंतर मराठा समाजात नाराजीचा सूर उमटत आहे. यामध्ये आता शालेय विद्यार्थ्यांनीही आपला सहभाग नोंदवला आहे.

मराठा आंदोलन
मराठा आरक्षणासाठी शालेय विद्यार्थ्यांचे आंदोलन
मराठा आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्यभरातील मराठा समाज आक्रमक झाला आहे. सुप्रीम कोर्टात आरक्षण टिकवू न शकल्याने राज्य सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त होत आहे. आज कोल्हापुरात मराठा समाजाला आरक्षण मिळावेयासाठी उत्तरेश्वर पेठमधील कार्यकर्त्यांनी व विद्यार्थ्यांनी उत्तरेश्वर मंदिर ते अंबाबाई मंदिर असा दंडवत घालण्याचा निर्णय घेतला. मात्र, पोलिसांनी या आंदोलकाना ताब्यात घेतले.