कोल्हापूर - कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही? अशी प्रतिक्रिया अभिनेता सयाजी शिंदे यांनी दिली. ते आज एका कार्यक्रम प्रसंगी कोल्हापुरात बोलत होते.
कुत्र्या-मांजरांना कळते आत्महत्या करू नये, मग माणसांना का कळत नाही: सयाजी शिंदे - सयाजी शिंदे आत्महत्या मत
शेतकरी, गरीब, श्रीमंत असे कोणीही आत्महत्या करतो. मात्र, माणसाने कठिण प्रसंगी देखील खंबीर राहिले पाहिजे. ही बाब निसर्गाकडून, प्राण्यांकडून शिकली पाहिजे, असे मत अभिनेता सयाजी शिंदे यांनी व्यक्त केले आहे.
कधी कोण आत्महत्या करेल, हे सांगता येत नाही. माणसाच्या मनात काय चालले हे अद्याप कोणाला कळले नाही. शेतकरी, गरीब, श्रीमंत असे कोणीही आत्महत्या करतो. मात्र, माणसाने कठिण प्रसंगी देखील खंबीर राहिले पाहिजे. ही बाब निसर्गाकडून, प्राण्यांकडून शिकली पाहिजे. अभिनेता सुशांत सिंहच्या आत्महत्येवर चाललेल्या आरोप-प्रत्यारोपांवर बोलणे माझा प्रांत नाही, असे अभिनेता सयाजी शिंदे म्हणाले.
दरम्यान, राज्यातील जुन्या देशी झाडांचा शोध घेऊन त्यांना सेलेब्रिटीचा दर्जा द्यावा, त्याठिकाणी शालेय विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहली आयोजित करून मुलांना त्याबाबत माहिती द्यावी, अशी मागणी यावेळी सयाजी शिंदे यांनी केली. कोणता कवी, अभिनेता, आमदार, खासदार हा सेलेब्रिटी नसून दोनशे वर्षे ऑक्सिजन देणारी झाडे खरे सेलेब्रिटी आहेत. त्यांना नमन केले पाहिजे, असे आवाहन देखील शिंदे यांनी केले.