Sayaji Shinde: कोल्हापूरात उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला सयाजी शिंदेंकडून जीवदान - कोल्हापूर
आपल्या सर्वांना आजारी पडल्यावर किंव्हा अपघात झाल्यावर ज्या पद्धतीने रुग्णालय, रुग्णवाहिका पाहीजे असते. त्याच पद्धतीने एखादे झाड उन्मळून पडले; तर त्यांच्यासाठी सुद्धा अशी यंत्रणा असायला हवी, असे मत सिनेअभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी व्यक्त केले. कोल्हापूरातल्या (Kolhapur) कळंबा तलाव येथे दोन दिवसांपूर्वी एक शाहू कालीन वटवृक्ष उन्मळून पडला होता. त्याबाबत माहिती मिळताच, सयाजी शिंदे यांनी त्याचे प्रत्यारोपण करण्याबाबत तयारी सुरु केली. आज सकाळी या वटवृक्षाच्या शेजारीच एक मोठा खड्डा खोदून त्याठिकाणी त्याचे प्रत्यारोपण केले. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.
![Sayaji Shinde: कोल्हापूरात उन्मळून पडलेल्या वटवृक्षाला सयाजी शिंदेंकडून जीवदान वटवृक्षा](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15841208-577-15841208-1657968539421.jpg)
कोल्हापूर : आपल्या सर्वांना आजारी पडल्यावर किंव्हा अपघात झाल्यावर ज्या पद्धतीने रुग्णालय, रुग्णवाहिका पाहीजे असते. त्याच पद्धतीने एखादे झाड उन्मळून पडले; तर त्यांच्यासाठी सुद्धा अशी यंत्रणा असायला हवी, असे मत सिनेअभिनेते व वृक्षप्रेमी सयाजी शिंदे (Sayaji Shinde) यांनी व्यक्त केले. कोल्हापूरातल्या (Kolhapur) कळंबा तलाव येथे दोन दिवसांपूर्वी एक शाहू कालीन वटवृक्ष उन्मळून पडला होता. त्याबाबत माहिती मिळताच, सयाजी शिंदे यांनी त्याचे प्रत्यारोपण करण्याबाबत तयारी सुरु केली. आज सकाळी या वटवृक्षाच्या शेजारीच एक मोठा खड्डा खोदून त्याठिकाणी त्याचे प्रत्यारोपण केले. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी.