कोल्हापूर - हाथरस अत्याचार प्रकरणी पीडितेच्या कुटुंबीयांना भेटायला गेलेल्या काँग्रेस नेते राहुल गांधींना जा पद्धतीने तिथल्या पोलिसांनी वागणूक दिली ही लज्जास्पद आहे. ही घटना लोकशाहीच्या विरोधातील आहे. अशाप्रकारे हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही, असे म्हणत गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी या घटनेचा तीव्र शब्दांत निषेध केला.
यूपी सरकारची 'ही' हुकूमशाही खपवून घेतली जाणार नाही - सतेज पाटील - हाथरस अत्याचार प्रकरण न्यूज
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली.
उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या सामूहिक प्रकरणावर देशभरातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर आज काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी पीडित तरुणीच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी जात असताना पोलिसांकडून त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. या घटनेमुळे काँग्रेसचे नेते संतप्त झाले असून घडलेल्या घटनेबाबत निषेध व्यक्त करत आहेत.
पालकमंत्री सतेज पाटील यांनीसुद्धा ट्वीट करत या घटनेचा निषेध व्यक्त केला. शिवाय आमच्या आदरणीय नेत्याबद्दल उत्तर प्रदेश पोलिसांद्वारे केलेली ही वागणूक योग्य नाही. योगी आदित्यनाथ सरकारची ही हुकूमशाही असून आपल्या देशात ही खपवून घेतली जाणार नसल्याचेही त्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.