कोल्हापूर: शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी काँग्रेसचे 22 आमदार फुटणार असल्याचे वक्तव्य केले होते. (Chandrakant Khaire statement about Congress MLA). यावर सतेज पाटील (Satej Patil) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांनी केलेले विधान हे संयुक्त नाही, चंद्रकांत खैरे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. शिवाय सुषमा अंधारे आणि आदित्य ठाकरे यांच्या सभेला परवानगी नाकारणे हे चुकीचे असून बंदोबस्त आणि परवानगी नाकारायचा हा नवा ट्रेण्डच राज्यात सुरु झाला असल्याची टीका सतेज पाटील यांनी केली आहे. तसेच भारत जोडो यात्रेत कोल्हापूरचे कार्यकर्ते हिंगोलीत सहभागी होणार असून या यात्रेत कोल्हापुरी बाणा दाखवणार असल्याचे ही त्यांनी सांगितले आहे.
चंद्रकांत खैरे यांनी आपले वक्तव्य मागे घ्यावे:जर सरकार पडले तर काँग्रेसचे 22 आमदार देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात असल्याचा दावा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे. याबाबत माजी गृहराज्यमंत्री आणि काँग्रेस नेते सतेज पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, चंद्रकांत खैरे यांनी अनेक वर्ष खासदार म्हणून काम केले असून ते शिवसेनेचे मोठे नेते आहेत. राज्यात महाविकास आघाडी म्हणून एकत्र जात असताना खैरे यांचे हे विधान संयुक्तिक नाही. त्यांनी त्यांचे विधान मागे घ्यावे असे आवाहन सतेज पाटील यांनी केले आहे. सध्या महाराष्ट्रात भारत जोडो यात्रा येत असून यामध्ये शिवसेना पक्ष म्हणून उद्धव ठाकरे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार हे सर्व सहभागी होत असतानाच असे वक्तव्य करून गैरसमज पसरवू नये असे आवाहन ही त्यांनी यावेळी केले आहे.