महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विरोधकांचे आव्हान गांभीर्याने घेतले पाहिजे; पण आजच्या घडीला 253 पेक्षाही अधिकांचा आपल्याला पाठिंबा - सतेज पाटील - Kolhapur Legislative Council

आजच्या परिस्थितीत जवळपास 253 पेक्षाही अधिक नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटलं आहे. तसेच विरोधकांचे आव्हान सुद्धा गांभीर्याने घेतले पाहिजे. मात्र, विजय आपलाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

satej patil
सतेज पाटील

By

Published : Nov 14, 2021, 10:26 AM IST

कोल्हापूर - कोल्हापूर विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीच्यावतीने पालकमंत्री सतेज पाटील हे रिंगणात आहेत. जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मी विकासकामांना प्राधान्य दिले आहे. तसेच मी महाविकास आघाडीतर्फे लढणार असल्याने आघाडीतील सर्वच नगरसेवक आपल्या सोबत आहेत, असे पालकमंत्री सतेज पाटील यांनी म्हंटलं आहे. शिवाय आजच्या परिस्थितीत जवळपास 253 पेक्षाही अधिक नगरसेवकांचा आपल्याला पाठिंबा असल्याचेही त्यांनी म्हंटलं. विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच पाटील यांनी प्रचाराचा सपाटाच लावला आहे. अनेकांच्या वयक्तिक भेटीगाठी घेत आहेत. आज इचलकरंजी येथे असता पालकमंत्री पाटील यांनी माध्यमांना आपली प्रतिक्रिया दिली. यावेळी विरोधकांचे आव्हान सुद्धा गांभीर्याने घेतले पाहिजे. मात्र, विजय आपलाच होईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

कोल्हापूर विधान परिषदेवर सतेज पाटील यांची प्रतिक्रिया
सतेज पाटील घेतायेत सर्वांच्या वयक्तिक भेटीगाठी -विधानपरिषदेची निवडणूक जाहीर होताच सतेज पाटील यांनी प्रचाराचा सपाटाच लावला आहे. जिल्ह्यातील प्रत्येकाच्या वयक्तिक भेटीगाठी घेत आहेत. सतेज पाटील यांचे पुतणे आमदार ऋतुराज पाटील सुद्धा प्रचारासाठी बाहेर पडले असून त्यांनी सुद्धा अनेकांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. आज सुद्धा इचलकरंजी शहरामध्ये विविध राजकीय पक्षांचे व महाविकास आघाडी सरकारमधील पक्षांच्या नगरसेवकांच्या गाठीभेटी घेतल्या. इचलकरंजीमध्ये सुद्धा 80 ते 85 टक्के नगरसेवकांचे आपल्याला पाठिंबा राहील, असा विश्वास सुद्धा सतेज पाटलांनी आज व्यक्त केला. बाहेरूनही छुपा पाठिंबा मोठ्या प्रमाणात -या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात काहीजण छुपा पाठिंबा देणार आहेत. काही अंतरगत आहेत. तर काहीजण जाहीर पाठिंबा देतील. त्यामुळे नक्कीच विजयाचा विश्वास आपल्याला आहे, असेही सतेज पाटील यांनी इचलकरंजी येथे म्हंटलं. दरम्यान, यावेळी आमदार राजू बाबा आवळे, नगरसेवक शशांक बावस्कर, संजय कांबळे, मदन कारंडे, नितीन जांभळे, सागर चाळके, राहुल खंजिरे, तानाजी हराळे, माजी आमदार राजू आवळे, महादेव गौड, बादशाह बागवान, विठ्ठल चोपडे, राजू आलासे यांच्यासह महाविकास आघाडी मधील सर्व नेते कार्यकर्ते उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details