महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sanjay Mandalik Taunts Aditya Thackeray: आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील; संजय मंडलिक यांचा टोला - संजय मंडलिकांचा आदित्य ठाकरेंना टोला

Sanjay Mandalik Taunts Aditya Thackeray: इंग्लंडहून छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत. ही वाघनखं (Shivaji Maharaj Waghnakh) शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत असा प्रश्न शिवसेनेच्या ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी राज्य सरकारला विचारला आहे. यावर शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक (Sanjay Mandlik) यांनी आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं (Allegations from Waghnakh) वाटत असतील असा टोला लगावला आहे. कोल्हापुरात ते आज (शनिवारी) पत्रकारांशी बोलत होते.

Sanjay Mandalik Taunts Aditya Thackeray
संजय मंडलिक

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 30, 2023, 9:40 PM IST

संजय मंडलिकांचे आदित्य ठाकरेंवर मत

कोल्हापूर Sanjay Mandalik Taunts Aditya Thackeray:छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाला ठार मारण्यासाठी वापरलेली वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत. मात्र, यावरून आता राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या जात आहेत. युवा सेना अध्यक्ष आमदार आदित्य ठाकरे यांनी सरकारला ही नखं शिवरायांची आहेत की शिवकालीन आहेत, याचा खुलासा करावा असं आव्हान दिलं आहे. तर शिवसेना शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी आदित्य ठाकरेंना स्वतःची नखं, वाघनखं वाटत असतील असा टोला लगावला आहे. कोल्हापुरात ते आज (शनिवारी) पत्रकारांशी बोलत होते.

तीन वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्रात असणार :इंग्लंडहून छत्रपती शिवरायांची वाघनखं महाराष्ट्रात आणली जात आहेत. ती मुंबईसह सातारा, कोल्हापूर या ठिकाणी ठेवण्यात येणार आहेत. राज्य शासनाने काढलेल्या शासन निर्णयानुसार तीन वर्षांसाठी ही वाघनखं महाराष्ट्रात असणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. यावरून आदित्य ठाकरे यांनी सरकारला प्रश्न विचारला आहे. ही वाघनखं शिवाजी महाराजांनी वापरलेली आहेत की शिवकालीन आहेत.


वाघनखांबद्दल आदित्य ठाकरेंना किती ज्ञान -छत्रपती शिवाजी महाराज यांची वाघनखं भारतात आणली जाणार आहेत. पण ही वाघनखं भारतात येण्याआधीच राजकीय वादळ उठले आहे. शिवसेनेचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांनी छत्रपती शिवरायांची ही वाघनखं खरी आहेत का? त्यांनी ती खरंच वापरली होती कां? असा सवाल राज्यकर्त्यांना करत त्यावर आक्षेप घेतला आहे. त्यावर आज शिंदे गटाचे खासदार संजय मंडलिक यांनी पहिल्यांदाच ठाकरे कुटुंबियांवर टीका केली आहे. तर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी खोचक टोला लगावला. छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मृतीचिन्ह कोणतेही असेल त्याचे शिवप्रेमी निश्चितच स्वागत करणार आहेत. तलवार आणि वाघनखं हे दोन्ही आणणार आहोत. त्याचं स्वागत महाराष्ट्र करेल, असंही खासदार मंडलिक म्हणाले. तर राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आमदार आदित्य ठाकरेंना वाघनखांबद्दल काय माहिती आहे, असा सवाल उपस्थित केला.

हेही वाचा:

  1. Fadnavis On Maratha Reservation : मराठा, ओबीसी समाजात भांडणे लावण्याची सरकारची भूमिका नाही; देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
  2. Wadettiwar On OBC Certificate : २८ लाख मराठ्यांना ओबीसीची प्रमाणपत्रे वाटण्यात आली; वडेट्टीवार यांचा गौप्यस्फोट
  3. Jayant Patil On NCP MLA: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वच आमदार आमच्या संपर्कात - जयंत पाटील

ABOUT THE AUTHOR

...view details