कोल्हापूर - करवीर तालुक्यातील निगवे खालचा गावचे वीरजवान संग्राम पाटील यांच्यावर आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. याच वीर संग्राम पाटील यांच्यासोबत तब्बल अठरा वर्षे देशसेवा केलेले नाईक सुभेदार राहुल सावंत यांनी त्यांच्या विषयीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. विशेष म्हणजे सावंत आणि संग्राम पाटील हे एकाच गावचे देशसेवा करणारे सुपुत्र आहेत. याबाबत त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी शेखर पाटील यांनी..
संग्राम यांचे तेच शब्द खरे ठरले... नाईक सुभेदार सावंतांनी दिला १८ वर्षातील आठवणींना उजाळा
काश्मीरच्या राजौरीमध्ये पाकिस्तानी सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केले होते. त्यांनी केलेल्या हल्ल्यात निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना वीरमरण आले. याच वीर संग्राम पाटील यांच्यासोबत तब्बल अठरा वर्षे देशसेवा केलेले नाईक सुभेदार राहुल सावंत यांनी त्यांच्या विषयीच्या आठवणी ताज्या केल्या आहेत.
नाईक सुभेदार सावंत
करवीर तालुक्यातील निगवे खालसा गावातील जवान संग्राम पाटील यांना काश्मीरमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्यात वीरमरण आले होते. त्यांच्यावर आज त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज दुपारी शोकाकूल वातावरणात त्यांच्यावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. त्यावेळी त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला.
Last Updated : Nov 23, 2020, 4:46 PM IST