कोल्हापूर-जिल्ह्यात सध्या कोरोनाची स्थिती गंभीर बनली आहे. मात्र,ज्यावेळी परिस्थिती हाताबाहेर नव्हती त्यावेळी प्रशासनाची भूमिका कशी होती याचा अनुभव कोल्हापुरातील गायकवाड कुटुंबाला आला. खासगी हॉस्पिटलने संगीता आनंदराव गायकवाड यांना दाखल करुन घेण्यास दिलेला नकार आणि प्रशासनाच्य नियोजनशून्यते मुळे जीव गमवावा लागला. केवळ उपचार न मिळाल्याने विनायक गायकवाड या तरुणला त्याची आई गमवावी लागली आहे. गायकवाड यांच्या अनुभवावरुन कोल्हापूर प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.
शासकीय आणि खासगी रुग्णलायत बेड मिळाला नाही
कोल्हापूरातील इरा पार्क मध्ये आनंदराव गायकवाड त्यांच्या कुटुंबासोबत राहतात. त्यांचे कुटुंब सध्या दुःखाच्या छायेत आणि मानसिक दडपणाखाली आहे. गायकवाड यांची पत्नी संगीता गायकवाड यांचा २४ जुलै रोजी उपचार न मिळाल्याने मृत्यू झाला. 22 जुलै रोजी अचानक संगीता गायकवाड यांना श्वासोच्छवास त्रास जाणवू लागला. अंगात ताप आल्याने त्यांना सीपीआरमध्ये नेण्यात आले. मात्र, बेड उपलब्ध नसल्याने त्यांना घरी पाठवले. रात्री अधिक त्रास जाणवू लागल्याने मुलगा विनायक गायकवाड याने त्याच्या मित्रांच्या मदतीने कोल्हापूरातील खासगी हॉस्पिटलच्या पायऱ्या झिजवल्या. मात्र, एकही हॉस्पिटलने त्यांना उपचारासाठी दाखल करून घेतले नाही. त्यामुळे उपचाराअभावी संगीता गायकवाड यांचा मृत्यू झाला.
मुलाने मित्रांच्या सहाय्याने आईच्या मृतदेहावर केले अंत्यसंस्कार