कोल्हापूर - हरिसालने भाजपचे राहिलेले सगळेच कपडे उतरवले आहेत. आता तेथील जनतेला दाखवण्यासारखं आणि बोलण्यासारखंही काही नसल्याचे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे. कोल्हापुरातील इचलकरंजी येथे राज ठाकरेंच्या सभेच्या पार्श्वभूमीवर ते 'ईटीव्ही भारत'शी बोलताना त्यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.
हरिसालने भाजपचे उरले-सुरले कपडे सुद्धा काढले - संदीप देशपांडे - raj thackery
भाजपने खोट्या जाहिराती दाखवल्या. सर्व जाहिराती मॅनेज होत्या, त्या जनतेला दाखवून देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला उघडे पाडले आहे.
![हरिसालने भाजपचे उरले-सुरले कपडे सुद्धा काढले - संदीप देशपांडे](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3025868-thumbnail-3x2-kolhapur.jpg)
संदीप देशपांडे म्हणाले, भाजपने खोट्या जाहिराती दाखवल्या. सर्व जाहिराती मॅनेज होत्या, त्या जनतेला दाखवून देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने भाजपला उघडे पाडले आहे. त्यामुळे आता जनतेला कळले आहे की, खरं कोण आणि खोट कोण हे चांगलच समजले आहे. भाजप सरकारे विकासकामांबाबत केलेल्या जाहिरातींची मनसेकडून पोलखोल करण्यात आली. जाहिरातीमध्ये दाखविण्यात आलेल्या लाभार्थींची आत्ताची परिस्थिती काय आहे, हे दाखवण्यात आले. त्यामुळे भाजपचे खोटे आता उघडे केले आहे. भाजपने केलेल्या सर्व जाहिराती मॅनेज केलेल्या होत्या, असेही यावेळी देशपांडे यांनी म्हटले आहे.