महाराष्ट्र

maharashtra

विधानसभा निवडणूक : संभाजीराजे छत्रपतींनी बजावला मतदानाचा हक्क

By

Published : Oct 21, 2019, 2:10 PM IST

विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

संभाजीराजे छत्रपती

कोल्हापूर- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. उमेदवारांचे भवितव्य आज ईव्हीएममध्ये बंद होणार आहे. तर मतदार राजाने कोणाच्या पारड्यात आपले मत टाकले, याचा निकाल 24 ऑक्टोबरला लागणार आहे. विधानसभा निवडणुकीसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी सहकुटुंब आपला मतदानाचा हक्क बजावला. तसेच त्यांनी मतदारांनी मतदानासाठी बाहेर पडावे, असे आवाहन संभाजीराजे यांनी केले.

शिवाय मतदान करणे, हा आपला अधिकार आहे, असे सांगत संभाजीराजे छत्रपती यांनी आपला मतदानाचा अधिकार बजावला. त्यांच्यासोबत युवराज शहाजीराजे यावेळी मतदान करण्यासाठी आले होते. त्यांनी सुद्धा यावेळी प्रथमच मतदान केले. जे सरकार चांगला विकास करते, ज्यांची कामे आपल्याला आवडतात त्यांना आपलं बहुमोल मत द्या, असे आवाहनसुद्धा यावेळी शहाजीराजेंनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details