कोल्हापूर -छत्रपती संभाजीराजे यांच्या राष्ट्रपती नियुक्त खासदारकीचा कार्यकाळ 3 मे रोजी संपला. यानंतर ते एक नवीन भूमिका घेऊन समोर येणार असल्याचे म्हटले होते. त्यानुसार येत्या 12 मे रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपली पुढील वाटचाल व भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती ( Former MP Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी म्हटले आहे. 3 मे रोजी कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी ट्विट केला होता. या संदर्भात बोलत असताना त्यांनी मी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj and Shahu Maharaj ) विचारांना मानणारा असून त्यांच्या विचारानुसार हीच माझी वाटचाल राहणार असल्याचे म्हटले आहे.
Sambhaji Raje Chhatrapati : 'येत्या 12 मे रोजी पुण्यात पुढची भूमिका जाहीर करणार' - खासदारकी बाबत संभाजीराजे लवकरच निर्णय घेणार
येत्या 12 मे रोजी पुण्यामध्ये पत्रकार परिषद घेत आपली पुढील वाटचाल व भूमिका स्पष्ट करणार असल्याचे संभाजीराजे छत्रपती ( Former MP Sambhaji Raje Chhatrapati ) यांनी म्हटले आहे. 3 मे रोजी कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी ट्विट केला होता. या संदर्भात बोलत असताना त्यांनी मी छत्रपती शिवाजी महाराज व शाहू महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj and Shahu Maharaj ) विचारांना मानणारा असून त्यांच्या विचारानुसार हीच माझी वाटचाल राहणार असल्याचे म्हटले आहे.
'...म्हणून केंद्रानेही पुढाकार घ्यावा' :छत्रपती शाहू महाराजांचे जीवन स्मारक व्हावे, यासाठी केंद्र सरकारकडे अनेकदा पाठपुरावा केला. मात्र राज्य सरकारनेच पुढाकार घेऊन येथे स्मारक तयार करण्यासाठी पुढे सरसावले आहेत. छत्रपती शाहू महाराज फक्त महाराष्ट्राचे नसून तर संपूर्ण देशाचे आहेत. देशपातळीवर असेल असा स्मारक येथे तयार होणे अपेक्षित असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शाहू महाराजांचे पुरोगामी विचार हे संपूर्ण देशात चालतात. यामुळे महाराष्ट्र सरकारच नाही तर केंद्र सरकारने सुद्धा जीवन स्मारक उभे करण्यात पुढाकार घेतला पाहिजे, अशी इच्छा त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.