कोल्हापूर- योग्यवेळी समरजीत घाटगे यांचा पैरा फेडला जाईल, असा इशारा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी देताच भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी मुश्रीफ यांचा चांगला समाचार घेतला आहे. ज्या गोष्टीची मला कल्पनाच नाही, त्यावरून माझ्यावर आरोप करण्यात आले. मात्र, कोण कोणाचा पैरा फेडेल हे जनताच ठरवेल. मी राजर्षी छत्रपती शाहूंच्या रक्ताचा वंशज आहे. असल्या गल्लीतल्या धमक्यांना मी घाबरत नाही, असा इशारा भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना दिला आहे.
भाजपचे नेते किरीट सोमैया यांनी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत निशाणा साधला. त्यानंतर मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत कोल्हापूरचे भाजपचे जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. किरीट सोमैया यांना माहिती पुरवणारे घाटगे आणि चंद्रकांत पाटील आहेत, असा आरोप मुश्रीफ यांनी केला. त्यानंतर भाजप जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी पत्रकार परिषदेत या आरोपाला प्रत्युत्तर दिले.