कोल्हापूर -आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती आज देशभरात उत्साहात साजरी झाली. मात्र, यावर्षी पहिल्यांदाच शाहूंच्या कार्याचे जिवंत स्मारक समजल्या जाणाऱ्या राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी झाली. यावेळी राधानगरी धरणातील पाण्याचे जलपूजन आणि याच पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करण्यात आला. यावेळी अठरापगड जातीचे नागरिकसुद्धा उपस्थित होते. यावेळी ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधीने शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांच्याशी चर्चा केली.
हेही वाचा -परवानगी नाकारली तरी राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करणार - समरजित घाटगे
राधानगरी धरणावर शाहू जयंती साजरी करण्यासाठी ऐनवेळी परवानगी नाकारण्यात आली होती. शिवाय गुन्हे दाखल करू, अशाप्रकारे नोटीस सुद्धा देण्यात आली होती. याबाबत बोलताना शाहू जनक घराण्याचे वंशज समरजितसिंह घाटगे यांनी, शाहू जयंती होऊ नये आणि बहुजन समाज एकत्र येऊ नये, यासाठी ज्यांनी प्रयत्न केले त्यांना भविष्यात बहुजन समाजच उत्तर देईल, असे म्हंटले.
राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने साजरी झाली शाहू जयंती
राधानगरी धरण बांधून तब्बल 100 वर्षांपूर्वी कोल्हापूर जिल्ह्यातील पाण्याचा प्रश्न ज्यांनी मार्गी लावला, त्या राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती जिल्ह्यातच नाही तर देशभरात साजरी होते. मात्र, शाहू महाराज यांना ज्या कागलमधील घाटगे घरण्यातून दत्तक घेतले गेले त्या घाटगे घराण्याचे वारसदार समरजितसिंह घाटगे यांची राजर्षी शाहूंची जयंती राधानगरी धरणावरच साजरी व्हावी, अशी इच्छा होती. याबाबत त्यांना एका धनगर समाजातील व्यक्तीने सुद्धा बोलून दाखवले होते. खरंतर राधानगरी धरण म्हणजे शाहू महाराजांचे जिवंत स्मारक समजले जाते. शाहू महाराजांनी हे धरण बांधून कोल्हापूर जिल्ह्याचा पाणीप्रश्न मिटवला. शिवाय बहुजन समाजासाठी त्यांनी अनेक कार्य केले. त्यामुळे, शाहू महाराजांचे स्मरण करण्यासाठी त्यांचे कार्य सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी समरजितसिंह घाटगे यांनी इथून पुढे शाहू महाराजांची जयंती राधानगरी धरणावर साजरी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार आज राधानगरी धरणावर विधिवत पद्धतीने, धरणातील जलपूजन आणि धरणामधील पाण्याने शाहूंच्या पुतळ्याला जलाभिषेक करून हा जन्मोत्सव सोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला असून यापुढे या सोहळ्याला अधिक व्यापक रूप प्राप्त होईल आणि सर्वजण यामध्ये सहभागी होतील, असेही घाटगे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना म्हंटले.
शाहू जयंती होऊ नये यासाठी प्रयत्न करणे म्हणजे घातकी विषय