कोल्हापूर - मागील काही दिवसांपासून समरजितसिंह घाटगे 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' या शिवार संवादाच्या माध्यमातून जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पन्हाळा-शाहूवाडी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावरच झुणका भाकरी खात घाटगे यांनी 'जनपंचयात' भरवली. यावेळी शेतकऱ्यांच्या विविध समस्या, व्यथा त्यांनी जाणून घेतल्या. तसेच सर्व समस्या शासनापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन त्यांनी दिले.
शेतकऱ्यांच्या बांधावर झुणका भाकरी खात भरली 'जनपंचयात'; आवश्य पाहा - samarjit singh ghatge in panhala
मागील काही दिवसांपासून समरजितसिंह घाटगे 'शाहू जनक घराण्याची जनपंचयात' या शिवार संवादाच्या माध्यमातून जिल्ह्याचा दौरा करत आहेत. पन्हाळा-शाहूवाडी दौऱ्यावर असताना शेतकऱ्यांच्या बांधावरच झुणका भाकरी खात घाटगे यांनी 'जनपंचयात' भरवली.
एकीकडे लॉकडाऊनमुळे सर्वांवर मोठे आर्थिक संकट ओढावले. त्यातच परतीच्या पावसाने शेतकऱ्यांचे नुकसान झाले. शेती, घर सर्वकाही आहे. मात्र आलेल्या आर्थिक संकटातून आम्हा शेतकऱ्यांना मार्ग काढावा लागत आहे. 15 हजारांसाठी दागिने गहाण ठेवायला लागल्याचे एका महिलेने सांगितले. अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी सुद्धा शासनाने मदत करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली.
वाढीव लाईट बिलाचा भार
आम्हा शेतकऱ्यांवर नेहमीच विविध संकट येत असतात. त्यातच आता लाईटबिल सुद्धा वाढून आल्याने ते कसं भरायचं, हा प्रश्न निर्माण झाला आहे. नेहमीपेक्षा दुप्पटीने बिलं आली आहेत. त्यासाठी सुद्धा शासनाने मदत करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र आता बिल भरावे लागेलच, असे म्हटले आहे. त्यामुळे काय करावे, असा प्रश्न पडल्याचे शेतकरी म्हणाले.