कोल्हापूर- कडकनाथ कोंबड्याच्या नावाखाली अनेक शेतकऱ्यांना कोट्यवधींचा चुना लावणाऱ्या महा रयत ऍग्रो या कंपनीत मी किंवा माझ्या कुटुंबाचा कोणताही संबंध असल्यास सहकुटुंब भर चौकात फाशी घेईन, असे वक्तव्य कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी केले. तसेच बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी चौकात विष्टा खावी, असे वादग्रस्त विधानही त्यांनी केले आहे. कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते.
...तर भर चौकात सहकुटुंब फाशी घेऊ - कृषी राज्यमंत्री खोत हेही वाचा -सहकारी बँक घोटाळा.. शिवस्वराज्य यात्रा सोडून अजित पवार मुंबईत दाखल
कडकनाथ कोंबडी घोटाळा राज्यभर चांगलाच गाजत आहे. या घोटाळ्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या जावयाचा हात असल्याची टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. यावरून खोत आणि शेट्टी यांच्यात टीका प्रतिटीकांच्या फैरी झडू लागल्या आहेत. सदाभाऊ खोत यांनी तर आज आपला संयम सोडत आरोप सिद्ध करू शकला नाही तर तुम्ही विष्ठा खा, असे वादग्रस्त वक्तव्य केले. शिवाय आरोप सिद्ध झाला तर माझे सर्व कुटुंबीय फाशी घेतील, असेही म्हणत कडकनाथ प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे मी सीआयडी चौकशीची मागणी केली असून मुख्यमंत्र्यांनी ती मागणी मान्यही केली असल्याचे खोत यांनी सांगितले.
हेही वाचा - सहकारी बँकांकडील 20 हजार कोटींच्या भांडवलात 25 हजार कोटींचा घोटाळा होणार कसा? - शेकाप नेते जयंत पाटील
राजकीय लढाई राजकारणाच्या पातळीवर लढुया. आम्ही बांगड्या भरलेल्या नाहीत, आम्हीही लढाऊ आहोत. राजू शेट्टी यांनी खोत यांना कोंबडीचोर म्हटले होते. याबाबत विचारले असता मंत्री खोत म्हणाले, कोंबडीची तांगडी खायची सवय त्यांना दुसरं काही आठवणार नाही. त्यामुळे तांगडे खाणाऱ्यांनी आपल्या आईची शपथ घ्यावी. राजकीय सूडबुद्धीने माझ्यावर आरोप केले गेले. लग्न पत्रिका दाखवली गेली पण मला मुलगीच नाही आणि भाऊही नाही. माझ्या गावात ८० टक्के लोक खोत आडनावाचे आहेत. त्यामुळे कोणीही माझे नाव लग्नपत्रिकेत टाकतात. महा रयत ऍग्रो आणि रयत क्रांती संघटना दोन शब्द समान असल्याने काही जण राजकीय पोळी भाजून घेत असल्याचेही त्यांनी यावेळी म्हटले.