महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही; चौकशी झाली पाहिजे - मुश्रीफ

कोणत्याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याबाबत काय झाले, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे चौकशीआधी काहीही टीका करणे अयोग्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपला काहीही आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले.

कोल्हापूर
कोल्हापूर

By

Published : Feb 13, 2021, 7:45 PM IST

कोल्हापूर- एखाद्या माणसाला बदनाम करणे योग्य नाही. कोणत्याही गोष्टीची चौकशी झाली पाहिजे. धनंजय मुंडे यांच्याबाबत काय झाले, हे आपल्यालाही माहिती आहे. त्यामुळे चौकशीआधी काहीही टीका करणे अयोग्य असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. सत्ता गेल्यामुळे भाजपला काहीही आरोप करायची सवय लागली आहे. त्यामुळे पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी चौकशी झाली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले. दरम्यान, पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणात एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्याने राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. शिवाय यामध्ये राज्य सरकारमधील एका मंत्र्यांचा संबंध असल्याचा भाजपकडून आरोप होऊ लागला आहे. त्यामुळे याबाबत चौकशीच्या आधी असे काहीही आरोप करणे चुकीचे असल्याचे मुश्रीफ म्हणाले. कोल्हापुरात एका आयोजित कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

कोल्हापूर

पडळकर यांचा बोलवता धनी फडणवीस : मुश्रीफ
यावेळी मुश्रीफ म्हणाले, गोपीचंद पडळकर यांची लायकी काय आहे, हे कालच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितली आहे. मागच्या वेळीसुद्धा शरद पवार यांच्यावर टीका केली होती. तेव्हा सुद्धा पडळकरबाबत माझी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. लायकी नसणारी माणसे बोलतायेत म्हणून मला वाटतंय त्यांचा बोलवता धनी देवेंद्र फडणवीसच आहेत. त्यांनी त्यांना आवरायला हवे नाहीतर याचे गंभीर परिणाम होतील, असेही मुश्रीफ म्हणाले.
आम्ही नेमकं काय करायचं?
शिवजयंती साधे पद्धतीने साजरी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. त्यानंतर शिवभक्तांमधून संताप व्यक्त होत आहे. एकीकडे नेत्यांचे, मंत्र्यांचे कार्यक्रम हजारोंच्या गर्दीने होतात, मग शिवजयंती का जल्लोषात साजरी करू नये? असा सवाल सुद्धा सर्वजण उपस्थित करत आहेत. यावर आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना मुश्रीफ म्हणाले, बंदी सगळ्यांसाठी आहेच. एकीकडे आम्ही नियमावली बनवली नाही आणि कोरोना रुग्ण वाढले तर आम्हालाच बोलणार, यांनी लक्ष दिले नाही, आकडे लपवतायेत आणि खबरदारी घेतली की म्हणतात आम्ही खबरदारी का घेतली? मग आम्ही नेमकं काय करायचं? असेही मुश्रीफ म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details