महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आजरा नगरपंचायतीत राडा; कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकानेच कर्मचार्‍यांना टाकले कोंडून - आजरा नगरपंचायत नगरसेवक न्यूज

आनंदा कुंभार या सत्ताधारी नगरसेवकाने आजरा नगरपंचायतीतील कर्मचाऱ्यांना कोंडले. कर्मचारी वेळेवर कामे करत नसल्याचे कुंभार यांचे म्हणणे आहे. नगरसेवकाने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

Ananda Kumbhar
आनंदा कुंभार

By

Published : Sep 1, 2020, 7:05 PM IST

कोल्हापूर -आजरा नगरपंचायतीच्या सत्ताधारी नगरसेवकाने वेळेत कामे होत नसल्याच्या निषेधात नगरपंचायतीच्या अधिकाऱ्यांना व कर्मचार्‍यांना कोंडून टाकल्याचा प्रकार घडला. आनंदा कुंभार असे या नगरसेवकाचे नाव असून वारंवार सांगूनसुद्धा कामे होत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तर नगरसेवकाने आपल्या वैयक्तिक स्वार्थासाठी कर्मचाऱ्यांना वेठीस धरणे चुकीचे असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.

कामे होत नसल्याने सत्ताधारी नगरसेवकानेच कर्मचार्‍यांना टाकले कोंडून

नगरपंचायतीमध्ये नगसेवकांची कामे होत नाहीत तर सर्वसामान्य नागरिकांची कामे कशी होणार? गेले सात ते आठ महिने फेर्‍या मारुनसुध्दा काम झालेले नाही. नगरपंचायतीचे अधिकारी देखील वेळेवर कार्यालयात हजर नसतात. या सर्व प्रकाराला कंटाळून आपण हे पाऊल उचलल्याचे आनंदा कुंभार यांनी सांगितले. या सर्व कारभाराला लिपीक संजय यादव जबाबदार असल्याचा आरोप नगरसेवक कुंभार यांनी केला आहे.

सत्ताधारी नगरसेवकानेच अधिकार्‍यांना कोंडून ठेवल्याने आजरा शहर‍ात हा प्रकार चर्चेचा विषय बनला आहे. मुख्यकार्यकारी अधिकारी रजेवर असल्याने आहेत. नगरसेवक कुंभार यांचा प्रश्न भुमिलेख कार्यालयाशी संबधित असल्याने मुख्याधिकाऱ्यांच्या आदेशाशिवाय त्यांचे पत्र संबधित विभागाला कसे देणार? असा प्रश्न संजय यादव यांनी उपस्थित केला. कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवणे हा प्रक‍ार योग्य नसून निषेधार्ह आहे, असेही संजय यादव यांनी सांगितले.

नगरसेवक माफी मागत नाही तोपर्यंत कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन -

घडलेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करत नगर पंचायतीच्या सर्वच कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले आहे. या प्रकाराने प्रामाणिक काम करणार्‍या नगरपंचायत कर्मचाऱ्यांचा संबंधित नगरसेवकाकडून अपमान झाला आहे. जोपर्यंत नगरसेवक कुंभार माफी मागणार नाहीत तोपर्यंत कामबंद आंदोलन करण्याचा पवित्रा नगरपंचायत कर्मचारी वर्गाने घेतला आहे. आजर‍ाच्या तहसिलदारांना याबाबत निवेदन देण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details