कोल्हापूर- येथील कळे याठिकाणी सात दरवाजे तोडून सराफ दुकान फोडल्याची घटना घडली आहे. सोनं, चांदी, रोकड मिळून 10 लाखांच्या ऐवजावर चोरांनी डल्ला मारला आहे.
हेही वाचा -पुणे-बंगळूरू राष्ट्रीय महामार्गवर तिहेरी अपघातात चौघे गंभीर जखमी

पन्हाळा तालुक्यातील कळे बाजारपेठमधील प्रियंका ज्वेलर्स या सराफ दुकानासह दुकानमालक अरुण पाटील यांच्या फ्लॅटमध्ये ही मोठी चोरी झाली आहे. यामध्ये 20 तोळे सोन्याचे दागिने, 4 किलो चांदीचे दागिने आणि 80 हजारांची रोकड असा ऐवज होता, अशी माहिती दुकानमालक अरुण पाटील यांनी पोलिसांना दिली आहे.
हेही वाचा -चंद्रकांत पाटलांच्या साडी वाटपानंतर कोल्हापुरात लंगोट वाटून निषेध
विशेष म्हणजे चोरांनी दुकानाचे मुख्य शटर न तोडता दुकानमालक पाटील यांच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये प्रवेश करत दुकानाच्या मागील बाजूचा दरवाजा तोडत असे एकूण सात दरवाजे तोडून दुकानात प्रवेश केला. यातील एक चोरटा सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
TAGGED:
kolhapur crime news