कोल्हापूर - मुसळधार झालेल्या पावसामुळे जिल्ह्यातील धरणे काठोकाठ भरली आहे. रत्नागिरी मार्गावर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. काही धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. काही मार्गांवर पाणी साचल्याने वाहतूक बंद तर कुठे वाहतूक वळवण्यात आली आहे.
कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर पाणीच पाणी; पर्यायी मार्गाने वळवली वाहतूक - कोल्हापूर
राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत. पावसाने थैमान घातले असून केर्ली गावाजवळील रस्त्यावर पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाने याठिकाणाहून होणारी वाहतूक बंद केली आहे. तर, रत्नागिरी हायवेवरून येणारी वाहतूक वाघबीळ जवळ बंद करून कोडोली मार्गे वळविण्यात आली आहे.
राधानगरी धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने धरणाचे 4 दरवाजे उघडले आहेत. पावसाच्या पाण्याने थैमान घातले असून केर्ली गावाजवळील रस्त्यावर पाणी आल्याने जिल्हा प्रशासनाने याठिकाणाहून होणारी वाहतूक बंद केली आहे. तर, रत्नागिरी हायवेवरून येणारी वाहतूक वाघबीळ जवळ बंद करून कोडोली मार्गे वळविण्यात आली आहे.
दरम्यान, कोल्हापूरात मुसळधार पाऊस सुरूच असून सद्या राधानगरी धरणातून प्रतिसेकंद 7112 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. जिल्ह्यातील 83 बंधारे पाण्याखाली गेले असून राजाराम बंधाऱ्याची पाणीपातळी 41.9 फूटपर्यंत पोहोचली आहे. सध्या पंचगंगा नदी धोक्याच्या पातळीकडे पोहोचत असून खबरदारी म्हणून कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील सुतारवाडा भागातील 5 कुटुंबं आणि 18 लोकांना खबरदारी म्हणून येथील मुस्लिम बोर्डिंग येथे स्थलांतरित करण्यात आले आहे.