महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

प्रदुषणमुक्तीचा संदेश देत कोल्हापुरात ऋतुराज पाटीलांनी सायकलवरून भरला उमेदवारी अर्ज - Ritu Raj Patil Candidate Application Form

कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या ऋतुराज पाटील यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऋतुराज पाटील सायकलने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले.

ऋतुराज पाटील

By

Published : Oct 3, 2019, 3:10 PM IST

कोल्हापूर- दक्षिण विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसकडून ऋतुराज पाटील यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. उमेदवारी अर्ज दाखल करताना ऋतुराज पाटील सायकलने जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. आपले कोल्हापूर आणि मतदारसंघ प्रदुषणमुक्त आणि फिट राहावे, हा सायकलवरून येण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

प्रतिक्रिया देताना काँग्रेस उमेदवार ऋतुराज पाटील

यावेळी हजारोंच्या संख्येने ऋतुराज यांचे समर्थक आपल्या सायकली घेऊन रॅलीमध्ये सहभागी झाले होते. ऋतुराज हे काेल्हापूर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष आमदार सतेज पाटील यांचे पुतणे आहेत. त्यांची लढत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष धनंजय महाडिक यांचे बंधू अमल महाडिक यांच्याशी होणार आहे. ऋतुराज पाटील आणि अमल महाडिक जरी निवडणुकीत आमने-सामने असले, तरी खरी लढत 'मुन्ना' आणि 'बंटी' यांच्यात मानली जाते. कारण या दोन्ही नेत्यांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न कोल्हापुरात निर्माण झाला आहे. त्यामुळे दोन्ही नेते जोरदारपणे मैदानात उतरले असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते.

हेही पाहा-नवरात्रोत्सव 2019 : तिरुपतीवरुन कोल्हापूरच्या अंबाबाईला मानाचा शालू

ABOUT THE AUTHOR

...view details