कोल्हापूर- कोरोची माळावर अज्ञात मारेकऱ्यांनी एका तरुणाचा गळा आवळून आणि डोक्यात सीमेंटचा खांब मारुन खून केल्याची घटना घडली आहे. हातकणंगले- इचलकरंजी रस्त्यावर मंगळवारी रात्री नऊच्या सुमारास ही घटना घडली. शुभम उमेश कमलाकर या २१ वर्षांचा तरुणाचा खून करण्यात आला आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेल नाही.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिक्षाचालक असलेला शुभम कमलाकर हा अविवाहित होता. तो रिक्षाचालवायचा आणि वेल्डिंगच्या दुकानात कामालाही जात होता. मंगळवारी काम आटोपल्यानंतर तो मित्रांसोबत कोरोची येथील माळावर गेला होता. यावेळी त्याने मित्रांसोबत मद्यप्राशन केले. मद्यप्राशनानंतर त्यांच्यात वाद निर्माण होऊन शुभमच्या डोक्यात सीमेंटचा खांब घालून आणि दोरीने गळा आवळून खून केला असावा, असा पोलिसानी संशय व्यक्त केला आहे. त्याची ओळख पटू नये यासाठी मारेकऱ्यांनी त्याच्या चेहऱ्यावर सीमेंट खांबाचे घाव घालून चेहऱ्याचा
चेंदामेंदा केला होता. रात्री उशिरापर्यंत माहिती घेण्याचे काम सरू होते. घटनास्थळी दोरी, सीमेंटचा खांब, नशा करण्यासाठी वापरले जाणारे बाँड पोलिसांना सापडले. श्वानपथक आणि ठसेतज्ज्ञ पथक पाचारण करण्यात आले होते. श्वानपथकाकडून शोध मोहीम राबविली जात आहे. मात्र, अंधारामुळे अडथळे येत होते. श्वानपथकाला घटनास्थळी रुमाल, ए.टी.एम. कार्ड सापडले आहे
हद्दीवरून हातकणंगले- शहापूर पोलिसांत वाद