महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

उलटा वाहणारा धबधबा पाहिलाय का? चला मग कोल्हापूरच्या मसाई पठारावर - kolhapur news

कोल्हापूर जिल्ह्यात एक असा धबधबा आहे, जो उलटा प्रवाहीत झालाय.. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण खरं आहे.

धबधबा

By

Published : Jul 11, 2019, 3:02 PM IST

कोल्हापूर - पावसाळ्यात अनेक धबधबे प्रवाहित होतात आणि हे सगळे धबधबे आकर्षकही असतात. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यात एक असा धबधबा आहे, जो उलटा प्रवाहीत झालाय.. ऐकून आश्चर्य वाटलं असेल पण आपण दृश्यांमध्ये पाहतोय तो हाच धबधबा आहे..

धबधबा

पन्हाळा तालुक्यातील मसाई पठारावर हा धबधबा आहे. याचं पाणी थेट उलट दिशेने प्रवाहीत होतंय. सध्या कोल्हापूर शहरासह पन्हाळा, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरीमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे दरीतील वाऱ्यामुळे हे पाणी उलट वरती येतं आणि हे दृष्य पाहण्यासाठी सध्या पर्यटक मसाई पठारावर मोठी गर्दी करत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details