महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'शिवाजी विद्यापीठा'चे नामकरण 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे करा - संभाजीराजे - 'शिवाजी विद्यापीठा'चे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नामकरण

कोल्हापूर विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे म्हटले जाते. हा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे विद्यापीठाचे नामकरण करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली.

'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नामकरण करा
'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे नामकरण करा

By

Published : Dec 4, 2019, 11:44 AM IST

Updated : Dec 4, 2019, 12:28 PM IST

कोल्हापूर - 'शिवाजी विद्यापीठ' आणि ज्या-ज्या ठिकाणी शिवाजी महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख आहे, ते दुरुस्त करण्याची मागणी छत्रपती संभाजीराजे यांनी केली आहे. या आशयाचे एक पत्र संभाजीराजे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मराठा आरक्षण मागणी आंदोलनातील आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची विनंतीही त्यांनी केली आहे.


कोल्हापूर विद्यापीठाला शिवाजी विद्यापीठ असे म्हटले जाते. हा शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख आहे. त्यामुळे 'छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ' असे विद्यापीठाचे नामकरण करण्याची मागणी संभाजीराजे यांनी केली.

हेही वाचा - झूम प्रकल्प प्रकरणी मनपावर कारवाई करा अन्यथा.., शिवसेनेचा इशारा

मागील काही दिवसांपासून शिवाजी महाराजांच्या नामोच्चारावरून अनेक चर्चा होत आहेत. यामध्ये अमिताभ बच्चन प्रकरण आणि केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद हे अलीकडील काळात घडलेली उदाहरणे आहेत. अशा प्रकारच्या घटनांवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून नामविस्ताराचा निर्णय तत्काळ घ्यावा, अशी मागणी संभाजीराजेंनी केली आहे.

Last Updated : Dec 4, 2019, 12:28 PM IST

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details