महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Belgaum bifurcation issues : बेळगाव विभाजनाचा प्रस्ताव, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा तापणार - छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वाद

बागलकोट येथील कांचन पार्कमध्ये असलेला छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा हटवल्याने सीमा भागात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. तसेच बेळगावचे पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी स्वातंत्र्यदिनी बेळगाव जिल्हा आणि बेळगाव तालुक्याच्या विभाजनाची घोषणा केली आहे. यामुळे गेल्या तीस वर्षांपासून सुरू असलेल्या चर्चेला पुन्हा उधाण आलं आहे. बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचे पडसाद सीमा भागात उमटणार असं दिसतंय.

Belgoan issue
बेळगाव विभाजन

By

Published : Aug 19, 2023, 12:39 PM IST

कोल्हापूर :गेल्या साठ वर्षाहून अधिक काळ धगधगत असलेला कर्नाटक-महाराष्ट्र सीमावाद सर्वोच्च न्यायालयाच्या निकालात अडकून पडला आहे. केंद्रात काँग्रेसचे सरकार असतानाही हा प्रश्न तसाच राहिला. भाजपाचे शासन आल्यानंतर तरी महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद मिटेल, अशी आशा होती. मात्र, गेल्या 9 वर्षांच्या कालावधीत सीमावाद 'जैसे थे' स्थितीत आहे. यंदा झालेल्या कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने बाजी मारत सत्ता हस्तगत केली.

बेळगाव जिल्हा विभाजनाचा घाट :आता काँग्रेसच्या कार्यकाळातच कर्नाटक शासनाकडून बेळगाव जिल्ह्याच्या विभाजनाचा घाट घातला जात आहे. त्यामुळे सीमा भागातील बांधवांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम सुरू आहे, अशी प्रतिक्रिया बेळगावसह सीमा भागात उमटत आहे. बेळगाव जिल्हा हा ३ भागात विभागला जाणार आहे. बेळगाव, गोकाक, चिकोडी असे जिल्हे निर्माण होणार आहेत. याबाबत कर्नाटकच्या हिवाळी अधिवेशनात प्रस्ताव ठेवण्यात येण्याचीही शक्यता वर्तवण्यात येत आहे.


छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यावरून पुन्हा वाद :बागलकोट येथील कांचन पार्कमध्ये असलेला छत्रपती शिवरायांचा पुतळा पोलीस बंदोबस्तात हटवण्यात आलाय. त्यानंतर त्याचे तीव्र पडसाद सीमा भागासह राज्यात उमटत आहेत. शिवपुतळा हटवल्याच्या निषेधार्थ आज बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ, जमखंडी, बेगी बदामी या तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात येणार आहे. यापूर्वीही बेंगलोरमधील सदाशिव नगरात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना झाली होती. तसेच हुक्केरी तालुक्यातील मनगुती येथेही पुतळा हटवण्यावरून वाद निर्माण झाला होता. यामुळे कर्नाटकला छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं इतकं वावडं का? असा सवालही सीमाभागातील नागरिक विचारत आहेत.


सीमा वादावरून नेते गप्प का - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्याकडून बेळगाव विभाजनाबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा सक्रिय सहभाग सीमाप्रश्न सोडवण्यात राहिला आहे. मात्र, बेळगाव जिल्ह्याचे विभाजन होत असताना महाराष्ट्रातील कोणत्याही नेत्यांनी याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाहीये, यामुळे या नेत्यांचे सीमा भागावरील प्रेम बेगडी आहे का? असा प्रश्न उपस्थित होतोय.

हेही वाचा :

  1. बेळगावमध्ये आज तणावाची स्थिती राहण्याची शक्यता, कर्नाटकचे अधिवेशन आणि महाराष्ट्र एकीकरण मेळाव्याला आजपासून प्रारंभ
  2. Border Dispute Protest : कर्नाटक-महाराष्ट्र सीमेजवळील कोगनोली टोल प्लाझाजवळ आंदोलन; पाहा व्हिडिओ
  3. Shiv Sena Agitation Kolhapur : कर्नाटकात शिवरायांच्या पुतळ्याची विटंबना; कोल्हापुरात पडसाद

ABOUT THE AUTHOR

...view details