मुंबई - सरसेनापती साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची सुनावणी आज मुंबई सत्र न्यायालयात झाली. त्यात आणखी अंतिम संरक्षणात वाढ मिळाली आहे. मात्र सुनावणी तहकूब केली गेली. पुढील सुनावणी 6 एप्रिल रोजी होईल.
सरसेनापती साखर कारखाना तसेच कोल्हापूर जिल्हा सहकारी बँक यामध्ये कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादीचे माजी मंत्री हसन मुश्रीफ त्यांच्या तिन्ही मुलांना अटकपूर्व जामीन मिळतोय का याबाबतची आज सुनावणे मुंबई सत्र न्यायालयात होणार होती. हसन मुश्रीफ यांच्याबाबत अंमलबजावणी संचलनालयाने कथित कंपनीमध्ये आणि बँकेमध्ये पैशाचा गैरव्यवहार करण्यात आला असा आरोप ठेवला गेला.
परिस्थितीजन्य आणि इतर पुरावे -यासंदर्भात हा गंभीर आरोप असल्यामुळे विविध प्रकारची कलमे लावून त्यांना अटक करणे जरुरी आहे. त्या अटकेसाठी तपास यंत्रणांच्याडे सादर करण्याजोगे काही परिस्थितीजन्य आणि इतर पुरावे उपलब्ध आहेत. त्यामुळेच हसन मुश्रीफ यांचा अटकपूर्व जामीन रद्द होऊ नये; असे इडीच्या वकिलांचे आधीच्या सुनावणीमध्ये म्हणणे होते. आत्यासाठी त्यांनी त्या दिवशी वेळ मागून घेतला होता. मात्र सत्र न्यायालयाचे न्यायाधीश यांनी वेळ आता संपला असल्यामुळे पुढच्या सुनावणीमध्ये नक्कीच आपण त्याबाबत सुनावणी करू असे म्हटले होते.