महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आता मेंढपाळ मेंढरांना घेऊन विनाअट या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाऊ शकणार - धैर्यशील माने - कोल्हापूर खासदार धैर्यशील माने

खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेंढपाळांना कोणत्याही अटींशिवाय या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या मागणीला आता यश आले आहे.

धैर्यशील माने
धैर्यशील माने

By

Published : Jun 5, 2020, 10:11 PM IST

कोल्हापूर - लॉकडाऊनमुळे सर्वकाही ठप्प झाल्याने अनेकजण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. आता काही प्रमाणात लॉकडाऊन शिथील करण्यात आला आहे. प्रत्येकाला या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जायचे असल्यास त्याची परवानगी घ्यावी लागत आहे. त्यामुळे धनगर समाजातील मेंढपाळांना सुद्धा आपली मेंढरे घेऊन कुठेही जाता येत नव्हते. मात्र, खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे मेंढपाळांना कोणत्याही अटींशिवाय या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यानुसार त्यांच्या मागणीला आता यश आले आहे.

खासदार धैर्यशील माने

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आता यावरच्या सर्वच अटी मागे घेतल्या असून मेंढपाळ कुठेही विना अट जाऊ शकतात, असे हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने यांनी म्हटले आहे. याबाबतचा आदेश सुद्धा सर्वच जिल्ह्यातील पोलीस प्रमुख तसेच प्रशासनाला दिला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. शिवाय केलेल्या मागणीनंतर तत्काळ निर्णय घेत सर्व जिल्ह्यात त्या पद्धतीचा आदेश दिल्याबद्दल माने यांनी राज्यशासनाचे आभार मानत अभिनंदन केले. दरम्यान जिल्ह्यातील काही मेंढपाळ बांधवांनी खासदार मानेंची भेट घेऊन त्यांचे आभार मानले.

ABOUT THE AUTHOR

...view details